रूमेवाडी नाक्याजवळ आंब्याचे झाड उन्मळून पडले
खानापूर : येथील रूमेवाडी नाक्याजवळ सुरू असलेल्या जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे रस्त्यांच्या बाजूला असलेल्या आंब्याचे मोठे झाड सायंकाळी सहा वाजता उन्मळून पडले. मात्र सुदैवाने रविवार असून देखील मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. रूमवेवाडी नाक्याजवळ खानापूर नंदगड रस्त्याच्या बाजूला असलेले जुने आंब्याचे झाड सुरू असलेल्या पाऊस आणि वाऱ्यामुळे सायंकाळी सहा वाजता अचानक उन्मळून पडले. झाडाच्या आसपास दुकाने तसेच गॅरेजसह इतर दुकाने आहेत. याठिकाणी कायम लोकांची गर्दी असते. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला. खानापूर शहर, खानापूर-जांबोटी, खानापूर-नंदगड यासह खानापूर शहरापासून ग्रामीण भागात जोडणाऱ्या रस्त्यावर अनेक जुनाट झाडे आहेत. ही सर्व जुनी झाडे पावसामुळे उन्मळून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यासाठी वनखात्याने तातडीने अशी जुनाट जीर्ण झाडे तातडीने हटवणे गरजेचे आहे. यासाठी वनखात्याने याबाबत दखल घेऊन तातडीने ही झाडे हटवावीत, अशी मागणी होत आहे.
Home महत्वाची बातमी रूमेवाडी नाक्याजवळ आंब्याचे झाड उन्मळून पडले
रूमेवाडी नाक्याजवळ आंब्याचे झाड उन्मळून पडले
खानापूर : येथील रूमेवाडी नाक्याजवळ सुरू असलेल्या जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे रस्त्यांच्या बाजूला असलेल्या आंब्याचे मोठे झाड सायंकाळी सहा वाजता उन्मळून पडले. मात्र सुदैवाने रविवार असून देखील मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. रूमवेवाडी नाक्याजवळ खानापूर नंदगड रस्त्याच्या बाजूला असलेले जुने आंब्याचे झाड सुरू असलेल्या पाऊस आणि वाऱ्यामुळे सायंकाळी सहा वाजता […]