रामदास नवमी विशेष रेसिपी नैवेद्याला बनवा आंब्याचा शिरा

साहित्य- दोन कप रवा अर्धा कप तूप दोन कप आंब्याचा गर दोन कप दूध अर्धी वाटी बारीक चिरलेला सुका मेवा अर्धा टीस्पून वेलची पूड मँगो एसेन्स अर्धा टीस्पून

रामदास नवमी विशेष रेसिपी नैवेद्याला बनवा आंब्याचा शिरा

साहित्य-

दोन कप रवा

अर्धा कप तूप

दोन कप आंब्याचा गर

दोन कप दूध

अर्धी वाटी बारीक चिरलेला सुका मेवा 

अर्धा टीस्पून वेलची पूड 

मँगो एसेन्स अर्धा टीस्पून 

ALSO READ: दिवटा – संत समर्थ रामदास

कृती-

सर्वात आधी गॅस वर एक एक पॅन ठेऊन त्यात तूप घाला आणि गरम होऊ द्या.

आता तुपात रवा घाला आणि मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. आता गॅसवर आणखी एक पॅन गरम करा आणि त्यात आंब्याचा गर मिसळा आणि पॅनमध्ये शिजवा. आता आंब्याच्या गरामध्ये रवा घाला आणि मिक्स करा. शिरा चांगला शिजण्यासाठी, दूध घाला आणि सर्वकाही मिसळत मध्यम आचेवर शिजवा. तसेच गोडवा येण्यासाठी साखर, वेलची पूड आणि मँगो एसेन्स घाला आणि सर्वकाही मिसळा. शेवटी सुक्या मेव्या आणि आंब्याच्या तुकड्यांनी सजवा. तर चला तयार आहे आपला रामदास नवमी विशेष नैवेद्य आंब्याचा शिरा रेसिपी. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: Samarth Ramdas Quotes In Marathi श्री समर्थ रामदास स्वामी यांचे सुविचार

Edited By- Dhanashri Naik 

ALSO READ: शेंगदाण्याची बर्फी रेसिपी