आंबा महोत्सवाला आजपासून प्रारंभ
बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि बागायत खात्यातर्फे शुक्रवारपासून क्लब रोड येथील ह्यूम पार्कमध्ये आंबा महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. यंदा आंबा महोत्सवाबरोबरच मनुकांचे प्रदर्शन आणि विक्रीही होणार आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, सरकारचे कार्यदर्शी शर्मा इक्बाल, प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टण्णावर आदींच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
बेळगाव आंबा ब्रँड
बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या आंब्यांचे प्रदर्शन आणि विक्री या ठिकाणी केली जाणार आहे. विशेषत: बेळगाव आंबा ब्रँड म्हणून तो ओळखला जाणार आहे. त्यामुळे आंबा खवय्यांना बेळगाव आंबा ब्रँडचे आकर्षण लागले आहे. शहरवासियांना आंबा महोत्सवाची उत्सुकता लागली असून हा महोत्सव रविवारपर्यंत सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत चालणार आहे.
Home महत्वाची बातमी आंबा महोत्सवाला आजपासून प्रारंभ
आंबा महोत्सवाला आजपासून प्रारंभ
बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि बागायत खात्यातर्फे शुक्रवारपासून क्लब रोड येथील ह्यूम पार्कमध्ये आंबा महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. यंदा आंबा महोत्सवाबरोबरच मनुकांचे प्रदर्शन आणि विक्रीही होणार आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, सरकारचे कार्यदर्शी शर्मा इक्बाल, प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टण्णावर आदींच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. […]