माणगाव स्मारकासाठी सरपंचासह ग्रामस्थांचे उपोषण; डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्याची मागणी

स्मारक परिसरात अन्य सुविधा देण्यासाठी पाठपुरावा सुरु; मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार कोल्हापूर प्रतिनिधी माणगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला विलंब होत असल्याच्या निषेधार्थ सरपंच राजू मगदूम, ग्रामपंचायत सदस्यासह 50 हून अधिक ग्रामस्थांनी सोमवारी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला विविध संघटना […]

माणगाव स्मारकासाठी सरपंचासह ग्रामस्थांचे उपोषण; डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्याची मागणी

स्मारक परिसरात अन्य सुविधा देण्यासाठी पाठपुरावा सुरु; मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार

कोल्हापूर प्रतिनिधी

माणगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला विलंब होत असल्याच्या निषेधार्थ सरपंच राजू मगदूम, ग्रामपंचायत सदस्यासह 50 हून अधिक ग्रामस्थांनी सोमवारी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला विविध संघटना व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जयंतीनिमित्त माणगाव येथे लंडन हाऊस, हॉलोग्राफी शो, व अन्य बांधकाम करण्यात आले आहे. या कामाचा लोकार्पण सोहळा मार्च 2020 मध्ये घेण्याचे निश्चित झाले होते. पण कोरोनामुळे हा लोकार्पण सोहळा स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर सरकारकडून आज अखेर या स्मारकाच्या लोकार्पण सोहळा संबंधी कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. या स्मारकाचा लोकार्पण सोहळा न झाल्यामुळे कोट्यावधी रुपयांची इमारत धूळखात आहे. बौद्ध समाजाने स्वत:च्या मालकीची गट नंबर 87 क्षेत्र 1 हेक्टर 82 आर इतकी जागा सरकारच्या नावे विना मोबदला केले आहे. गट नंबर 87 मध्ये विविध कामे प्रस्तावित आहेत. या प्रस्तावित कामांमध्ये बौद्ध समाजाने दिलेल्या जागे सभोवती कंपाऊंड घालून त्यावरती महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत घटना व माणगाव येथील ऐतिहासिक परिषदेच्या पार्श्वभुमीचे शिलालेख तयार करणे. बौद्ध विहार व त्यास संलग्न 5 हजार चौरस फुट इतक्या आकाराचे ग्रंथालयासह बौद्ध धम्माविषयी अभ्यासासाठी ग्रंथ व पुस्तके उपलब्ध करणे, तसेच 100 भंन्तेजींसाठी निवासस्थान इमारत उभी करणे, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णाकृती पुतळे, व मुख्य प्रवेशव्दाराजवळ परिषदेचे जनक आप्पासाहेब पाटील यांचा पुतळा उभारणे. सदर जागेच्या आजुबाजूच्या परिसराचे सुशोभिकरण करणे, माणगांव परिषदेत संमत केलेल्या 15 ठरावांची माहिती असणारी प्रतिकृती बनविणे. माणगांव परिषदेचा माहितीपट, अशोकस्तंभ व संविधानाची प्रतिकृती (मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये) तयार करणे, 500 आसन क्षमतेचे छोटे थिएटरसह स्टेज ज्यामध्ये डॉक्युमेंटरी, व्हिडीओज व माहितीपटाचा समावेश करणे. 300 चारचाकी वाहन पाकिंग व्यवस्था करणे, तसेच मान्यवर व्यक्तींसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार निर्माण करणे. माणगाव परिषदेचे जनक स्वर्गीय आप्पासाहेब पाटील यांचे समाधीस्थळ सुशोभिकरण करणे, स्वर्गीय आपासाहेब पाटील यांना शासनातर्फे मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करणे, माणगाव परिषदेचे जनक स्वर्गीय आप्पासाहेब पाटील यांचे समाधीस्थळ सुशोभिकरण करणे. स्वर्गीय आपासाहेब पाटील यांना शासनातर्फे मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करणे आदी कामांचा समावेश आहे. पण शासनाकडून या कामांबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही.
ही कामे करण्याबाबत वेळोवेळी प्रशासन आणि शासनस्तरावर मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे माणगावचे सरपंच राजू मगदूम यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.