मंदार देसाई ‘आरपीडी श्री’चा मानकरी

बेळगाव : आरपीडी कॉलेज आयोजित 13 व्या आरपीडी श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत बीबीएच्या मंदार देसाईने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर आरपीडी श्री हा मानाचा किताब पटकाविला. आरपीडी कॉलेजच्या सभागृहात 13 व्या आरपीडी श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास 25 खेळाडूंनी भाग घेतला होता. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हनुमान मूर्तीचे पूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन […]

मंदार देसाई ‘आरपीडी श्री’चा मानकरी

बेळगाव : आरपीडी कॉलेज आयोजित 13 व्या आरपीडी श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत बीबीएच्या मंदार देसाईने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर आरपीडी श्री हा मानाचा किताब पटकाविला. आरपीडी कॉलेजच्या सभागृहात 13 व्या आरपीडी श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास 25 खेळाडूंनी भाग घेतला होता. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हनुमान मूर्तीचे पूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
60 किलो वजनी गट : 1) किशोर पुजारी (बीए 1) 2) मल्लेश ताळीमनी (बीए 1) 3) ज्ञानेश्वर चिक्की (बीए 1) 4) गणेश सांगावकर (बी. कॉम 3). 65 किलो वजनी गट : 1) विशाल निलजकर (बी. कॉम 3) 2) अशोक काकतकर (बीए 1). 70 किलो वजनी गट : 1) मंदार देसाई (बीबीए 3) 2) साहिल देमन्नाचे (बी. कॉम 3) 3) हरिशा चौगुले (बी. कॉम 3) यांनी विजेतेपद पटकाविले.
त्यानंतर आरपीडी श्रीसाठी किशोर पुजारी विशाल निलजकर व मंदार देसाई यांच्यात लढत झाली. त्यामध्ये बीबीए 3 चा मंदार देसाईने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर आरपीडी श्री हा मानाचा किताब पटकाविला. आरपीडीचे ज्येष्ठ माजी शरीरसौष्ठवपटू पुंडलिक जैनोजी, प्रवीण मजुकर, डॉ. एस. एस. पाटील, प्रसन्ना जोशी, एस. एस. शिवनगौड, क्रीडा निर्देशक डॉ. रामकृष्ण एन. यांच्या हस्ते विजेत्या शरीरसौष्ठवपटूंना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून राष्ट्रीय पंच गंगाधर एम., सुनील पवार, सुनील राऊत यांनी काम पाहिले.