केएलई-सिव्हिल हॉस्पिटलमधून मोटारसायकली चोरणाऱ्याला अटक
साडेतीन लाखांच्या 13 मोटारसायकली जप्त
बेळगाव : एका अट्टल दुचाकी चोराला अटक करून एपीएमसी पोलिसांनी 13 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या युवकाने बेळगाव परिसरातील अनेक ठिकाणी मोटारसायकली चोरल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील केएलई इस्पितळ व सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात उभ्या करण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या मोटारसायकली तो चोरायचा. पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. विठ्ठल सदेप्पा आरेर (वय 35) रा. शिगीहळ्ळी, ता. बैलहोंगल असे त्याचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, त्रिवेणी नाटीकर, किरण होनकट्टी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार, व्ही. डी. बाबानगर, डी. सी. सागर, बसवराज भानसे, केंपण्णा दोडमनी, नामदेव लमाणी आदींचा समावेश असलेल्या पथकाने विठ्ठलला अटक केली आहे. विठ्ठलने बेळगाव शहरातील या दोन्ही इस्पितळांच्या आवारातून चोरलेल्या 3 लाख 35 हजार रुपये किमतीच्या 13 मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी ही कारवाई करणाऱ्या पथकाचे कौतुक केले आहे.
Home महत्वाची बातमी केएलई-सिव्हिल हॉस्पिटलमधून मोटारसायकली चोरणाऱ्याला अटक
केएलई-सिव्हिल हॉस्पिटलमधून मोटारसायकली चोरणाऱ्याला अटक
साडेतीन लाखांच्या 13 मोटारसायकली जप्त बेळगाव : एका अट्टल दुचाकी चोराला अटक करून एपीएमसी पोलिसांनी 13 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या युवकाने बेळगाव परिसरातील अनेक ठिकाणी मोटारसायकली चोरल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील केएलई इस्पितळ व सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात उभ्या करण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या मोटारसायकली तो चोरायचा. पोलीस उपायुक्त पी. व्ही. […]