Solapur Crime : सोलापुरात पूर्ववैमनस्यातून लोखंडी रॉडने मारहाण, जोडभावी पेठ पोलिसात गुन्हा दाखल

                                            सोलापूर मारहाण प्रकरण सोलापूर ; मारहाण पूर्ववैमनस्यातून लोखंडी रॉडने करणाऱ्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मल्लिकार्जुन लिंगप्पा बग्गूर (रा. धोत्रीकर बस्ती, भवानी पेठ, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋषिकेश चिंतलप्पा […]

Solapur Crime : सोलापुरात पूर्ववैमनस्यातून लोखंडी रॉडने मारहाण, जोडभावी पेठ पोलिसात गुन्हा दाखल

                                            सोलापूर मारहाण प्रकरण
सोलापूर ; मारहाण पूर्ववैमनस्यातून लोखंडी रॉडने करणाऱ्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मल्लिकार्जुन लिंगप्पा बग्गूर (रा. धोत्रीकर बस्ती, भवानी पेठ, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋषिकेश चिंतलप्पा साळुंखे (रा. भवानी पेठ, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
९ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास मल्लिकार्जुन बग्गूर हे रूपाभवानी मंदिराजवळ होते. त्यावेळी बग्गूर व त्यांचा भाऊ रेवण असे दुचाकीवरून हॉस्पिटलला जात असताना ऋषिकेश साळुंखे हा त्याच्या दुचाकीवरून (एमएच १३-एजी ००९०) आला. साळुंखे याने कालच्या भांडणाचा राग मनात धरून बग्गूर यांस शिवीगाळ करून पोलिसात तक्रार देतो का असे म्हणून हातातील लोखंडी रॉडने बग्गूर यांच्या डोक्यात मारून जखमी केले. तसेच बग्गूर यांच्या भावास हाताने मारहाण केली व ढकलून दिले. याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार दुधाळे तपास करीत आहेत.