रस्ते अपघातात ममता बॅनर्जी जखमी
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी कार अपघातात जखमी झाल्या. बर्दवानमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आटोपून कारने राजधानी कोलकाता येथे परतत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्या हेलिकॉप्टरने परतणार होत्या. मात्र, खराब हवामानामुळे त्यांना कारने परतावे लागले. याचदरम्यान रस्त्यात समोरून उंच वाहन पाहून चालकाने अचानक ब्र्रेक लावल्यामुळे ममता बॅनर्जी यांचे डोके काचेवर आदळले. त्यांच्या डोक्याला किरकोळ जखम होण्याबरोबरच त्याच कारमध्ये बसलेले इतर लोकही जखमी झाले. दुसऱ्या वाहनाची धडक लागू नये म्हणून कार अचानक थांबवावी लागल्यामुळे ममता बॅनर्जी जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
Home महत्वाची बातमी रस्ते अपघातात ममता बॅनर्जी जखमी
रस्ते अपघातात ममता बॅनर्जी जखमी
वृत्तसंस्था/ कोलकाता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी कार अपघातात जखमी झाल्या. बर्दवानमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आटोपून कारने राजधानी कोलकाता येथे परतत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्या हेलिकॉप्टरने परतणार होत्या. मात्र, खराब हवामानामुळे त्यांना कारने परतावे लागले. याचदरम्यान रस्त्यात समोरून उंच वाहन पाहून चालकाने अचानक ब्र्रेक लावल्यामुळे ममता बॅनर्जी यांचे डोके काचेवर आदळले. त्यांच्या […]
