पाणीपुरीवाला निघाला ड्र्ग्स विक्रेता

मालवणी पोलिसांनी 8 लाख रुपये किमतीचे 101 ग्रॅम मेफेड्रोन (MD, एक अंमली पदार्थ) बाळगल्याप्रकरणी एका पाणीपुरी विक्रेत्याला अटक केली आहे. 21 वर्षीय कैफ खान या विक्रेताला 18 ऑक्टोबर रोजी मालवणी इथून अटक करण्यात आले आहे.  पोलिसांनी सांगितले की, वांद्रे येथील रहिवासी असलेला खान मालवणी येथे ड्रग्ज वितरीत करण्यासाठी आला होता. त्यांनी सांगितले की, खानची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून वांद्रे पूर्व येथील लाल मिट्टी येथे विक्री होते. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश साळुंखे व त्यांचे पथक मालवणी परिसरात गस्त घालत असताना ही अटक करण्यात आली. आणखी एका प्रकरणात, वांद्रे पोलिसांनी सोनू हाडोळे नावाच्या एका व्यक्तीला 11 लाख रुपयांचे एमडी बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याने फातिमा नावाच्या महिलेकडून 41 ग्रॅम एमडी घेतल्याचा आरोप आहे. त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हेही वाचा लॉरेन्स बिश्नोईला मारणाऱ्या पोलिसाला 1 कोटीचे बक्षिस : करणी सेनासलमान खान प्रकरणात 5 कोटी खंडणी मागणाऱ्याने मागितली माफी

पाणीपुरीवाला निघाला ड्र्ग्स विक्रेता

मालवणी पोलिसांनी 8 लाख रुपये किमतीचे 101 ग्रॅम मेफेड्रोन (MD, एक अंमली पदार्थ) बाळगल्याप्रकरणी एका पाणीपुरी विक्रेत्याला अटक केली आहे. 21 वर्षीय कैफ खान या विक्रेताला 18 ऑक्टोबर रोजी मालवणी इथून अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, वांद्रे येथील रहिवासी असलेला खान मालवणी येथे ड्रग्ज वितरीत करण्यासाठी आला होता. त्यांनी सांगितले की, खानची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून वांद्रे पूर्व येथील लाल मिट्टी येथे विक्री होते. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश साळुंखे व त्यांचे पथक मालवणी परिसरात गस्त घालत असताना ही अटक करण्यात आली. आणखी एका प्रकरणात, वांद्रे पोलिसांनी सोनू हाडोळे नावाच्या एका व्यक्तीला 11 लाख रुपयांचे एमडी बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याने फातिमा नावाच्या महिलेकडून 41 ग्रॅम एमडी घेतल्याचा आरोप आहे. त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हेही वाचालॉरेन्स बिश्नोईला मारणाऱ्या पोलिसाला 1 कोटीचे बक्षिस : करणी सेना
सलमान खान प्रकरणात 5 कोटी खंडणी मागणाऱ्याने मागितली माफी

Go to Source