मळेवाड – कोंडुरे गावाला स्वतंत्र धान्य दुकान परवाना द्या !
हेमंत मराठे यांनी नायब तहसीलदारांना दिले निवेदन
न्हावेली / वार्ताहर
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कार्यक्षेत्रातील कोंडुरे या महसुली गावाला स्वतंत्रपणे रास्त धान्य दुकान परवाना द्यावा अशी मागणी उपसरपंच हेमंत मराठे यांनी महसूलला निवेदन देऊन केली आहे.ग्रामपंचायत मळेवाड -कोंडूरे ही ग्रुप ग्रामपंचायत असून दोन महसुली गाव या ग्रामपंचायतीला जोडलेले आहेत.यापैकी मळेवाड गावामध्ये रास्त धान्य दुकान असून कोंडुरे गावातील रास्त धान्य ग्राहकांना सुमारे साडेतीन ते चार किलोमीटरची पायपीट करून रास्त धान्य दुकानावर धान्य उचल करण्यासाठी यावे लागते.तरी कोंडुरे हे गाव महसुली वेगळे असल्याने या गावात स्वतंत्र रास्त धान्य दुकान परवाना द्यावा अशी मागणी मळेवाड- कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी सावंतवाडी तहसीलदार यांची भेट न झाल्याने त्यांच्यावतीने नायब तहसीलदार मनोज मुसळे यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.हा परवाना मिळाल्यास रास्त धान्य ग्राहकांची गैरसोय दूर होणार आहे असेही दिलेल्या निवेदनात मराठे यांनी नमूद केले आहे.
Home महत्वाची बातमी मळेवाड – कोंडुरे गावाला स्वतंत्र धान्य दुकान परवाना द्या !
मळेवाड – कोंडुरे गावाला स्वतंत्र धान्य दुकान परवाना द्या !
हेमंत मराठे यांनी नायब तहसीलदारांना दिले निवेदन न्हावेली / वार्ताहर ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कार्यक्षेत्रातील कोंडुरे या महसुली गावाला स्वतंत्रपणे रास्त धान्य दुकान परवाना द्यावा अशी मागणी उपसरपंच हेमंत मराठे यांनी महसूलला निवेदन देऊन केली आहे.ग्रामपंचायत मळेवाड -कोंडूरे ही ग्रुप ग्रामपंचायत असून दोन महसुली गाव या ग्रामपंचायतीला जोडलेले आहेत.यापैकी मळेवाड गावामध्ये रास्त धान्य दुकान असून कोंडुरे […]