मलेशियाला मिळाला नवा राजा
वृत्तसंस्था/ क्वालालंपूर
सुलतान इब्राहिम इस्कंदर वयाच्या 65 व्या वषी मलेशियाच्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत. त्यांच्या रुपाने मलेशियाला नवा राजा मिळाला आहे. आगामी 5 वर्षे ते हे सिंहासन सांभाळतील. सुलतान यांनी बुधवारी देशाचा 17वा सुलतान म्हणून शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीशी संबंधित कार्यक्रमाचे सरकारी टीव्हीवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. शपथविधी समारंभापूर्वी ते खासगी जेटने क्वालालंपूरला पोहोचले होते.
जोहोर राज्याचे शासक सुलतान इब्राहिम इस्कंदर राजा म्हणून निवडून आले. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 500 अब्ज रुपये इतकी आहे. त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती रिअल इस्टेट, खाणकाम ते दूरसंचार आणि पाम तेल व्यवसायापर्यंत आहे. त्यांच्याकडे मलेशियाच्या राजघराण्यातील 300 हून अधिक लक्झरी कार असून त्यात अॅडॉल्फ हिटलरने भेट दिलेल्या कारचा समावेश आहे. तसेच बोईंग 737 सह खासगी विमानांचा ताफादेखील आहे. धनाढ्या संपत्तीबरोबरच त्यांच्या कुटुंबाकडे खासगी सैन्यदेखील आहे. मलेशियातील आघाडीच्या सेलफोन सेवा पुरवठादारांपैकी एक असलेल्या यु मोबाईलच्या होल्डिंग्जमध्ये त्यांचा 24 टक्के हिस्सा आहे.
Home महत्वाची बातमी मलेशियाला मिळाला नवा राजा
मलेशियाला मिळाला नवा राजा
वृत्तसंस्था/ क्वालालंपूर सुलतान इब्राहिम इस्कंदर वयाच्या 65 व्या वषी मलेशियाच्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत. त्यांच्या रुपाने मलेशियाला नवा राजा मिळाला आहे. आगामी 5 वर्षे ते हे सिंहासन सांभाळतील. सुलतान यांनी बुधवारी देशाचा 17वा सुलतान म्हणून शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीशी संबंधित कार्यक्रमाचे सरकारी टीव्हीवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. शपथविधी समारंभापूर्वी ते खासगी जेटने क्वालालंपूरला पोहोचले होते. […]