ऑस्ट्रेलियात शोरुम उघडणारी मलाबार पहिली भारतीय सराफी कंपनी
बेळगाव : मलाबार गोल्ड अँड डायमंडने ऑस्ट्रेलिया येथे आपली शोरुम उघडली आहे. या ठिकाणी शोरुम उघडणारी मलाबार ही पहिली भारतीय सराफी कंपनी आहे. सिडनी येथे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ब्रेट ली यांच्या हस्ते शोरुमचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मलाबारचे कार्यकारी संचालक (इंटरनॅशनल ऑपरेशन्स) शामलाल अहमद, कार्यकारी संचालक अशर ओ. (एमडी इंडिया ऑपरेशन्स), ईस्ट अँड ऑस्ट्रेलियाचे विभागीय प्रमुख अजित एम. उपस्थित होते. याशिवाय सिडनी सरकारचे प्रतिनिधी व अन्य व्यवस्थापकीय सदस्य उपस्थित होते. मलाबारच्या एकूण 13 देशांमध्ये शोरुम्स आहेत. भारतामध्ये 340 शोरुम्स आहेत. यावेळी बोलताना अहमद म्हणाले, आमच्यासाठी हा अत्यंत स्मरणीय क्षण आहे. ‘मेक इन इंडिया मार्केट टू वर्ल्ड’ला मलाबारचा पूर्णपणे पाठिंबा आहे. ऑस्ट्रेलियामध्ये गुंतवणूक करून लोकांना येत्या काही वर्षात नोकरी उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सिडनी येथील शोरुममध्ये 18 व 22 कॅरेटमधील सोने आणि हिऱ्यांचे दागिने तसेच दररोज घालता येण्याजोगे खास वधूसाठीचे आणि सणासमारंभाचे असे 30 हजार नमुन्यातील दागिने उपलब्ध आहेत. ऑस्ट्रेलियावासी आम्हाला प्रतिसाद देतील, याची आम्हाला खात्री आहे. अशर ओ. यांनी मलाबारची वाटचाल कथन करून लवकरच राजस्थान, पुद्दुच्चेरी, उत्तराखंड, झारखंड, गोवा, आसाम, त्रिपुरा व जम्मू-काश्मीर या ठिकाणी शोरुम सुरू होतील, असे सांगितले.
Home महत्वाची बातमी ऑस्ट्रेलियात शोरुम उघडणारी मलाबार पहिली भारतीय सराफी कंपनी
ऑस्ट्रेलियात शोरुम उघडणारी मलाबार पहिली भारतीय सराफी कंपनी
बेळगाव : मलाबार गोल्ड अँड डायमंडने ऑस्ट्रेलिया येथे आपली शोरुम उघडली आहे. या ठिकाणी शोरुम उघडणारी मलाबार ही पहिली भारतीय सराफी कंपनी आहे. सिडनी येथे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ब्रेट ली यांच्या हस्ते शोरुमचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मलाबारचे कार्यकारी संचालक (इंटरनॅशनल ऑपरेशन्स) शामलाल अहमद, कार्यकारी संचालक अशर ओ. (एमडी इंडिया ऑपरेशन्स), ईस्ट अँड ऑस्ट्रेलियाचे विभागीय प्रमुख […]