कांदा-लसूण शिवाय बनवा बटाट्याची रसदार भाजी

साहित्य- बटाटे – पाच चिरलेले टोमॅटो – दोन चिरलेले हिरवी मिरची – दोन चिरलेली कोथिंबीर – अर्धा कप चिरली जिरे – 1 चमचा

कांदा-लसूण शिवाय बनवा बटाट्याची रसदार भाजी

साहित्य-

बटाटे – पाच चिरलेले

टोमॅटो – दोन चिरलेले 

हिरवी मिरची – दोन चिरलेली 

कोथिंबीर – अर्धा कप चिरली 

जिरे – 1 चमचा 

हिंग – चिमूटभर

हळद -अर्धा चमचा 

धणे पूड – अर्धा चमचा  

तिखट 

गरम मसाला 

चवीनुसार मीठ 

तेल 

 

कृती-

एका पॅनमध्ये तेल घालून जिरे आणि हिंग घालावे. मग त्यामध्ये हिरवी मिरची घालावी. आता टोमॅटो घालावे व परतवून घ्यावे त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. आता पॅनमध्ये टोमॅटोची ही प्युरी घालावी व वरतून हळद, तिखट, धणे पूड, मीठ घालावे व परतवून घ्यावी त्यानंतर यामध्ये बटाटे घालावे व मिक्स करावे आता झाकण ठेऊन वाफ येऊ द्यावी. तसेच भाजी शिजल्यानंतर त्यावरून कोथिंबीर घालावी तर चला तयार आहे आपली कांदा लसूण न वापरता रसदार बटाटा भाजी, गरम पोळी किंवा पराठा सोबत सर्व्ह करू शकतात.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik