टोमॅटो न वापरता बनवा हैद्राबादी आबंट डाळ, जाणून घ्या रेसिपी

रोज रोज तेचतेच डाळ खाऊन सर्वांना कंटाळ येतो. प्रत्येक कुटुंबाला रोज रात्री जेवणात काहीतरी नवीन खावे असे वाटते. पण महिलांना हाच प्रश्न असतो की रोजरोज काय बनवावे. म्हणून आज आपण पाहू या आंबट डाळीची रेसिपी. जी विना टोमॅटो देखील तयार होते व अगदीच …

टोमॅटो न वापरता बनवा हैद्राबादी आबंट डाळ, जाणून घ्या रेसिपी

रोज रोज तेचतेच डाळ खाऊन सर्वांना कंटाळ येतो. प्रत्येक कुटुंबाला रोज रात्री जेवणात काहीतरी नवीन खावे असे वाटते. पण महिलांना हाच प्रश्न असतो की रोजरोज काय बनवावे.म्हणून आज आपण पाहू या आंबट डाळीची रेसिपी. जी विना टोमॅटो देखील तयार होते व अगदीच सर्वांना देखील आवडेल.

 

साहित्य-

तूर डाळ- 1 वाटी 

हिरवी मिरची- 1 चमचा कापलेल्या 

आले- छोटा अर्धा चमचा किसलेले 

हळद- अर्धा चमचा 

मीठ- चवीनुसार  

जिरे – छोटा अर्धा चमचा 

लसूण- पेस्ट केलेली 

तिखट- 1 चमचा  

हिंग – चिमूटभर 

कढीपत्ता- दोन काडी 

कोथिंबीर- 1 चमचा बारीक चिरलेली 

चिंच- 1 चमचा 

आवश्यकतेनुसार पाणी 

 

कृती- 

सर्वात आधी तूर डाळ घेऊन ती स्वच्छ धुवून घ्यावी. मग एक तासांसाठी पाण्यात भिजत घालावी. 

एका कुकरमध्ये भिजवलेली डाळ, हिरवी मिरची, आले, हळद, मीठ आणि पाणी घालून तीन ते चार शिट्टी घ्यावी. 

 

आता मधून वाफ निघाल्यानंतर डाळ मिक्स करवून घ्यावी व त्यामध्ये चिंच घालावी. आता डाळ माध्यम गॅस वर उकळून घ्यावी. एका छोट्या पॅनमध्ये तेल किंवा तूप घालून त्यामध्ये मोहरी, जिरे घालावे. 

 

यानंतर लसूण, तिखट, हींग, कढीपत्ता, वाळलेली मिरची घालावी व परतवावे. या तडक्यामध्ये डाळ घालावी. व कोथींबीर घालावी. आता डाळ गरम भातासोबत किंवा पोळी सोबत सर्व्ह करू शकतात. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik