नवरात्री स्पेशल: कांदा-लसूणशिवाय बनवा स्वादिष्ट ग्रेव्ही

साहित्य- लाल टोमॅटो एक शिमला मिरची हिरवी मिरची एक तुकडा आले मलाई काजू जिरे

नवरात्री स्पेशल: कांदा-लसूणशिवाय बनवा स्वादिष्ट ग्रेव्ही

साहित्य-

लाल टोमॅटो 

एक शिमला मिरची 

हिरवी मिरची 

एक तुकडा आले 

मलाई 

काजू 

जिरे 

एक तुकडा दालचिनी 

वेलची, लवंग, तमालपत्र 

लाल तिखट, धणे पूड, हळद, जिरे पूड, मीठ 

  

कृती- 

सर्वात आधी टोमॅटो स्वच्छ धुवून त्यांचे तुकडे करून ते तव्यावर भाजून घ्यावे.आता ह्या टोमॅटो सोबत  सिमला मिरची, हिरवी मिरची आणि आले देखील घालावे. तसेच काजू देखील बारीक करून घ्यावे. 

 

आता कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, दालचीनी, वेलीची, लवंग तमालपत्र घालवावे. व परतवून घ्यावे. आता नंतर यामध्ये टोमॅटोची केलेली प्युरी घालावी. व मसाले घालावे. तसेच टोमॅटोमधील पाणी आटायला लागेल. 

 

ग्रेव्हीचे तेल निघायला लागेल तेव्हा त्याचे काजूची केलेली पूड आणि मीठ घालावे. व मलाई देखील घालावी. मग गरम मसाला आणि कसूरी मेथी घालून ग्रेवी तयार करावी.

 

तर चला तयार आहे आपली लसूण कांदा न वापरता टोमॅटोची ग्रेव्ही, जी तुम्ही पनीर, छोले, मटर, राजमा इत्यादी सोबत सर्व्ह करू शकतात.  

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik