काही मिनिटांत बनवा ब्रेड आणि पनीरचा चविष्ट नाश्ता मसाला फ्रेंच टोस्ट

ब्रेकफास्ट मध्ये काय बनवावे आणि काय नाही…हा विचार प्रत्येकाच्या मनात येत असतो. याकरिता आज आम्ही तुम्हाला ब्रेड आणि पनीर पासून बनलेला एक असा नाश्ता सांगत आहोत जो झटपट तयार होतो आणि आरोग्याला फायदेशीर देखील आहे. तर चला पाहूया ब्रेड आणि चीज पासून …

काही मिनिटांत बनवा ब्रेड आणि पनीरचा चविष्ट नाश्ता मसाला फ्रेंच टोस्ट

ब्रेकफास्ट मध्ये काय बनवावे आणि काय नाही…हा विचार प्रत्येकाच्या मनात येत असतो. याकरिता आज आम्ही तुम्हाला ब्रेड आणि पनीर पासून बनलेला एक असा नाश्ता सांगत आहोत जो झटपट तयार होतो आणि आरोग्याला फायदेशीर देखील आहे. तर चला पाहूया ब्रेड आणि चीज पासून मसाला फ्रेंच टोस्ट बनवण्याची रेसिपी. 

 

साहित्य-

ब्रेड- 4 तुकडे

पनीर – अर्धा कप

हिरवी मिरची- 2

लसूण पाकळ्या- 4

कांदा- 1

टोमॅटो- 1

शिमला मिरची- 1

तिखट-अर्धा चमचा 

हळद – अर्धा चमचा 

धणे पावडर- 1 चमचा 

काळी मिरी पूड- 1 चमचा 

मीठ चवीनुसार

तेल – 1 चमचा

 

कृती-

मसाला फ्रेंच टोस्ट बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करावे. यानंतर यामध्ये लसूण, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, हिरवी मिरची टाकून भाजून घ्या. आता यामध्ये लाल तिखट, काळे मिरे पूड, धणे पूड आणि मीठ घालून मिक्स करा. आता यामध्ये पाणी घालून थोडावेळ बाजूला ठेवावे. यानंतर पनीर ग्रेट करावे आणि यामध्ये मध्ये घालून सर्व मिक्स करावे. आता हे मिश्रण थंड होऊ द्यावे. स्टफिंगला ब्रेड मध्ये भरावे. तसेच दोन्ही साईडने तव्यावर भाजून घ्यावे. तर चला तयार आहे आपले मसाला फ्रेंच टोस्ट.  

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik