आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारांचे गणित बदलले

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकांसाठी मंगळवारी आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांसाठी प्रभागनिहाय चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, यावर्षी आरक्षणाचे पुनर्निर्धारण झाल्याने अनेक अनुभवी आणि वरिष्ठ माजी नगरसेवकांचे प्रभाग राखीव झाले आहेत. त्यांना आता शेजारील किंवा पर्यायी प्रभाग शोधावे लागत आहेत. या बदलाचा परिणाम विरोधी पक्षनेते रवी राजा, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, आणि माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांवर झाला आहे. काही माजी नगरसेवकांना मात्र पूर्वीप्रमाणेच आरक्षण राखण्यात आले आहे. या सोडतीमुळे भाजप, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या प्रभागांत बदल झाले आहेत. काहींना मतदारसंघ बदलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत असंतोष किंवा बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे. राखीव झालेल्या माजी नगरसेवकांमध्ये हे प्रमुख नावे आहेत:नील सोमैया (भाजप) – माजी खासदार किरीट सोमैया यांचे सुपुत्रआसिफ झकारिया (काँग्रेस) – बांद्रा पश्चिमचे अनुभवी नगरसेवकमनोज कोटक (भाजप) – माजी खासदार व नगरसेवकमंगेश सातमकर (शिवसेना – शिंदे गट)आशीष चेंबूरकर (शिवसेना – ठाकरे गट)तसेच, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर आणि वहिनी हर्षिता नार्वेकर यांच्या प्रभागांनाही आरक्षण लागले आहे. दोघांमध्ये प्रभागांची अदलाबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.भाजप आमदार पराग अलवाणी यांच्या पत्नी ज्योती अलवाणी आणि आमदार रईस शेख (एआयएमआयएम), जे स्वतः माजी नगरसेवक आहेत, यांचेही प्रभाग राखीव झाले आहेत.आता राखीव झालेले माजी नगरसेवकांचे प्रभागमाजी नगरसेवक पूर्वीचे आरक्षण सध्याचे आरक्षणज्योती अलवाणी (भाजप) सर्वसाधारण ओबीसीआसिफ झकारिया (काँग्रेस) सर्वसाधारण सर्वसाधारण (महिला)मनोज कोटक (भाजप) सर्वसाधारण सर्वसाधारण (महिला)नील सोमैया (भाजप) सर्वसाधारण ओबीसी (महिला)रमेश कोरगावकर (शिवसेना – ठाकरे) सर्वसाधारण सर्वसाधारण (महिला)मंगेश सातमकर (शिवसेना – शिंदे) ओबीसी सर्वसाधारण (महिला)रवी राजा (भाजप) सर्वसाधारण ओबीसी (महिला)मिलिंद वैद्य (शिवसेना – ठाकरे) सर्वसाधारण ओबीसीआशीष चेंबूरकर (शिवसेना – ठाकरे) सर्वसाधारण सर्वसाधारण (महिला)यशवंत जाधव (शिवसेना – शिंदे) सर्वसाधारण सर्वसाधारण (महिला)रईस शेख (एआयएमआयएम) ओबीसी सर्वसाधारणअतुल शाह (भाजप) सर्वसाधारण सर्वसाधारण (महिला)मकरंद नार्वेकर (भाजप) सर्वसाधारण सर्वसाधारण (महिला)ज्यांच्या प्रभागांवर आरक्षणाचा परिणाम नाही आरक्षणाच्या नव्या सोडतीत खालील नेत्यांचे प्रभाग पूर्ववत राहिले आहेत राखी जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)  गीता गवळी (अखिल भारतीय सेना)  माजी महापौर किशोरी पेडणेकर (शिवसेना – ठाकरे) माजी महापौर श्रद्धा जाधव माजी उपमहापौर हेमांगी वर्लिकर आणि भाजप गटनेते प्रभाकर शिंदेहेही वाचा BMC Election: 227 वॉर्डपैकी 115 वॉर्ड महिलांसाठी आरक्षित

आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारांचे गणित बदलले

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकांसाठी मंगळवारी आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांसाठी प्रभागनिहाय चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, यावर्षी आरक्षणाचे पुनर्निर्धारण झाल्याने अनेक अनुभवी आणि वरिष्ठ माजी नगरसेवकांचे प्रभाग राखीव झाले आहेत. त्यांना आता शेजारील किंवा पर्यायी प्रभाग शोधावे लागत आहेत.या बदलाचा परिणाम विरोधी पक्षनेते रवी राजा, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, आणि माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांवर झाला आहे. काही माजी नगरसेवकांना मात्र पूर्वीप्रमाणेच आरक्षण राखण्यात आले आहे.या सोडतीमुळे भाजप, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या प्रभागांत बदल झाले आहेत. काहींना मतदारसंघ बदलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत असंतोष किंवा बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे.राखीव झालेल्या माजी नगरसेवकांमध्ये हे प्रमुख नावे आहेत:नील सोमैया (भाजप) – माजी खासदार किरीट सोमैया यांचे सुपुत्र
आसिफ झकारिया (काँग्रेस) – बांद्रा पश्चिमचे अनुभवी नगरसेवक
मनोज कोटक (भाजप) – माजी खासदार व नगरसेवक
मंगेश सातमकर (शिवसेना – शिंदे गट)
आशीष चेंबूरकर (शिवसेना – ठाकरे गट)तसेच, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर आणि वहिनी हर्षिता नार्वेकर यांच्या प्रभागांनाही आरक्षण लागले आहे. दोघांमध्ये प्रभागांची अदलाबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजप आमदार पराग अलवाणी यांच्या पत्नी ज्योती अलवाणी आणि आमदार रईस शेख (एआयएमआयएम), जे स्वतः माजी नगरसेवक आहेत, यांचेही प्रभाग राखीव झाले आहेत.आता राखीव झालेले माजी नगरसेवकांचे प्रभागमाजी नगरसेवक
पूर्वीचे आरक्षण
सध्याचे आरक्षण
ज्योती अलवाणी (भाजप)
सर्वसाधारण
ओबीसी
आसिफ झकारिया (काँग्रेस)
सर्वसाधारण
सर्वसाधारण (महिला)
मनोज कोटक (भाजप)
सर्वसाधारण
सर्वसाधारण (महिला)
नील सोमैया (भाजप)
सर्वसाधारण
ओबीसी (महिला)
रमेश कोरगावकर (शिवसेना – ठाकरे)
सर्वसाधारण
सर्वसाधारण (महिला)
मंगेश सातमकर (शिवसेना – शिंदे)
ओबीसी
सर्वसाधारण (महिला)
रवी राजा (भाजप)
सर्वसाधारण
ओबीसी (महिला)
मिलिंद वैद्य (शिवसेना – ठाकरे)
सर्वसाधारण
ओबीसी
आशीष चेंबूरकर (शिवसेना – ठाकरे)
सर्वसाधारण
सर्वसाधारण (महिला)
यशवंत जाधव (शिवसेना – शिंदे)
सर्वसाधारण
सर्वसाधारण (महिला)
रईस शेख (एआयएमआयएम)
ओबीसी
सर्वसाधारण
अतुल शाह (भाजप)
सर्वसाधारण
सर्वसाधारण (महिला)
मकरंद नार्वेकर (भाजप)
सर्वसाधारण
सर्वसाधारण (महिला)ज्यांच्या प्रभागांवर आरक्षणाचा परिणाम नाहीआरक्षणाच्या नव्या सोडतीत खालील नेत्यांचे प्रभाग पूर्ववत राहिले आहेत 
राखी जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) गीता गवळी (अखिल भारतीय सेना) माजी महापौर किशोरी पेडणेकर (शिवसेना – ठाकरे) माजी महापौर श्रद्धा जाधव माजी उपमहापौर हेमांगी वर्लिकर आणि भाजप गटनेते प्रभाकर शिंदेहेही वाचाBMC Election: 227 वॉर्डपैकी 115 वॉर्ड महिलांसाठी आरक्षित

Go to Source