मुचंडी मैदानातील प्रमुख लढत बरोबरीत

वार्ताहर /किणये मुचंडी गावातील जागृत सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रेनिमित्त मंदिरासमोरील आखाड्यात भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस या आखाड्यात कुस्त्या झाल्या. या आखाड्यात बेळगाव परिसरातील 40 पैलवानांच्या चटकदार कुस्त्या झाल्या. बेळगाव तालुक्यातील व परिसरातील पैलवानांना प्रोत्साहन मिळावे यासाठी स्थानिक पैलवानांच्या कुस्त्यांची आयोजन करण्यात आले होते. आखाड्याचे पूजन ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मण बुद्री यांच्या हस्ते […]

मुचंडी मैदानातील प्रमुख लढत बरोबरीत

वार्ताहर /किणये
मुचंडी गावातील जागृत सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रेनिमित्त मंदिरासमोरील आखाड्यात भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस या आखाड्यात कुस्त्या झाल्या. या आखाड्यात बेळगाव परिसरातील 40 पैलवानांच्या चटकदार कुस्त्या झाल्या. बेळगाव तालुक्यातील व परिसरातील पैलवानांना प्रोत्साहन मिळावे यासाठी स्थानिक पैलवानांच्या कुस्त्यांची आयोजन करण्यात आले होते. आखाड्याचे पूजन ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मण बुद्री यांच्या हस्ते करण्यात आले. देवस्थान पंचकमिटीचे महालिंग वालीशेट्टी, मल्लाप्पा पाटील, सुदर्शन खनगावकर, अरविंद भातकांडे आदींनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.  गावातील लहान मुलांच्या एकापेक्षा एक अशा चटकदार कुस्त्या झाल्या. पहिल्या क्रमांकाची कुस्ती गौस कुरंगी व महेश तीर्थकुंडे यांच्यात लावण्यात आली.
दोन्हीनी एकमेकांच्या ताकतीचा अंदाज घेत कुस्तीला प्रारंभ केला. 15 मिनिटानंतर पंचांनी ही कुस्ती बरोबरीत सोडवली. पंच म्हणून सुदर्शन खनगावकर यांनी काम पाहिले. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये सचिन व मल्लेश यांच्यात झाली. ही कुस्ती अगदी चटकदार झाली. यामध्ये सचिन विजयी ठरला. पंच म्हणून अतुल शिरोळे यांनी काम पाहिले. याचबरोबर शरण गुलबर्गा, प्रल्हाद मुचंडी, कार्तिक इंगळगी यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून मुचंडी कुस्ती मैदान जिंकले. या आखाड्यात सहा महिलांच्या विशेष कुस्त्याही झाल्या. कुस्त्यांसाठी महिलांना प्राध्यान्य दिल्यामुळे कुस्तीप्रेमींतून समाधान व्यक्त करण्यात आले. पंच म्हणून रावजी खाडले, संजय चौगुले, लक्ष्मण बसरीकट्टी, बाबू मोटरे यांनी काम पाहिले.