Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

महाराष्ट्रात मध्यप्रदेशाच्या लाडली बहन योजनेच्या धर्तीवर 1 जुलै पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचे उध्दिष्टय राज्यातील लाखो महिलांना आर्थिक सहाय्य देऊन आर्थिक दृष्टया सक्षम करणे आहे. या योजने अंतर्गत राज्य सरकार …

Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

महाराष्ट्रात मध्यप्रदेशाच्या लाडली बहन योजनेच्या धर्तीवर 1 जुलै पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचे उध्दिष्टय राज्यातील लाखो महिलांना आर्थिक सहाय्य देऊन आर्थिक दृष्टया सक्षम करणे आहे. या योजने अंतर्गत राज्य सरकार लाभार्थी महिलांना त्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये पाठवणार आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थी महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. या योजनेला विरोधी पक्षाने नौटंकी असल्याचं म्हटलं आहे. 

या योजने बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले, राज्यातील नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या सर्व योजना या कायमस्वरूपी आहे. या बंद होणार नाही. असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. तसेच महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत तीन मोफत सिलिंडर आणि मासिक मदत केल्याची तरतूद अर्थ संकल्पात केली आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्व महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदे सरकारची ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. ही योजना येत्या 2 ते 3 महिन्यात बंद होणार उद्धव ठाकरे यांनी असा दावा केला. तसेच यंदा सत्ताधारी आघाडीचे सरकार निवडणुकीत विजयी होणार नाही.

या वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत म्हटले, महिलांना दरमहा 1500 रुपये आणि वार्षिक 18,000 रुपये देण्याची योजना, तसेच तीन सिलिंडर मोफत देण्याची योजना ही भगिनींसाठी रक्षाबंधन भेट आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. ही दीर्घकालीन योजना आहे.

 
Edited by – Priya Dixit  

 

 

Go to Source