Majhi Ladki Bahin Yojana| दादा, आम्हाला पैसे नको, महागाई कमी करा

महायुती सरकारच्या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा करण्यात आली. या योजनेतंर्गत अल्प उत्पन्न गटातील महिलांना महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र, लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मदत नको असून महागाई कमी करण्याची मागणी केली आहे. गॅस, वीज, पेट्रोल-डिझेल दर कमी करणे, चांगले रस्ते तयार करणे, शिक्षण व रुग्णालय खर्च कमी करणे, तसेच नोकरी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.