हलगेकर कुस्ती समितीतर्फे फेब्रुवारीत मैदान
बेळगाव : चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समितीची वार्षिक बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. फेब्रुवारीत होणार कुस्ती मैदान. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शंकर मुचंडी होते. विमल ग्रुपच्या सभागृहात आयोजिलेल्या बैठकीत व्यासपीठावर कार्याध्यक्ष गुलाब जंगु शेख, अशोक हलगेकर, अनिल चौगुले आदी उपस्थित होते. प्रारंभी अशोक हलगेकरने मागील बैठकीचा आढावा घेतला. सुवर्ण वर्ष महोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात कुस्ती घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गेली 25 वर्षे चुडाप्पा सीमती हलगेकरतर्फे आनंदवाडी आखाड्यात कुस्ती मैदान भरविण्याची परंपरा चालू ठेवली आहे. यावर्षी रौप्य महोत्सवानिमित्त भव्य कुस्ती मैदान, दंड बैठका, व खो-खो, कब•ाr स्पर्धा भरविण्याचे एक मताने ठरविण्यात आले आहे. यावेळी कुस्ती प्रशिक्षक मारूती घाडी, ठेकेदार बाळाराम पाटील, आनंद जाधव, प्रभाकर हलगेकर उपस्थित होते. सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनेच यावर्षी कुस्ती मैदान यशस्वी करण्याचा निर्धार गुलाब शेख यांनी केला. ग्रामीण भागातील कुस्ती परंपरा ठेवण्यासाठी हलगेकर कुस्ती समितीने कार्य चालु ठेवले आहे. यावेळी सदानंद हलगेकर, गजानन घोरपडे, मधुकर वेर्लेकर, विनोद जाधव, सुनील हुक्केरीकर, ईश्वर पाटील, आनंद जांबोटकर, धनंजय हदगल, शिवाजी पाटील, मारूती तुळजाई, अरूण पाटील, राजु जाधव, विनोद मोहिते, राजु चौगुले, महेश पाटील आदी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी हलगेकर कुस्ती समितीतर्फे फेब्रुवारीत मैदान
हलगेकर कुस्ती समितीतर्फे फेब्रुवारीत मैदान
बेळगाव : चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समितीची वार्षिक बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. फेब्रुवारीत होणार कुस्ती मैदान. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शंकर मुचंडी होते. विमल ग्रुपच्या सभागृहात आयोजिलेल्या बैठकीत व्यासपीठावर कार्याध्यक्ष गुलाब जंगु शेख, अशोक हलगेकर, अनिल चौगुले आदी उपस्थित होते. प्रारंभी अशोक हलगेकरने मागील बैठकीचा आढावा घेतला. सुवर्ण वर्ष महोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात कुस्ती घेण्याचे आवाहन त्यांनी […]