उपवासासाठी ‘फलाहारी आलू चाट’ हा एक अतिशय चटपटीत आणि झटपट होणारा पदार्थ आहे. नेहमीची खिचडी किंवा वरीचा भात खाऊन कंटाळा आला असेल, तर हा बदल नक्कीच आवडेल.
ALSO READ: Mahashivratri Special Recipe झटपट बनवा उपवासाची कचोरी
साहित्य-
उकडलेले बटाटे-३-४ मध्यम आकाराचे
शेंगदाणे-अर्धी वाटी
हिरवी मिरची-२-३
जिरं- १ छोटा चमचा
उपवासाचे मीठ-चवीनुसार
काळी मिरी पूड-अर्धा चमचा
लिंबाचा रस-१ मोठा चमचा
ताजी कोथिंबीर
तूप किंवा तेल- २ मोठे चमचे
डाळिंबाचे दाणे
कृती-
१. एका पॅनमध्ये तूप किंवा तेल गरम करा. त्यात जिरे आणि हिरवी मिरची टाका. आता बटाट्याच्या फोडी घालून मध्यम आचेवर त्या सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत परता.
२. बटाटे छान कुरकुरीत झाले की त्यात सेंदव मीठ आणि काळी मिरी पूड घालून व्यवस्थित मिक्स करा.
३.आता यात तळलेले शेंगदाणे घाला किंवा कूट घाला.
४. गॅस बंद करा. आता वरून लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
५. तयार आलू चाट एका प्लेटमध्ये काढून घ्या. वरून डाळिंबाचे दाणे आणि थोडे उपवासाचे ‘बटाटा कीस’ घालून सर्व्ह करा.
खास टिप्स
जर तुम्हाला दही आवडत असेल, तर या चाटवर थोडे गोड दही आणि जिरे पूड घालून ‘फलाहारी दही आलू चाट’ बनवू शकता.
तुम्ही यासोबत हिरवी मिरची आणि कोथिंबीरची उपवासाची चटणी सुद्धा जोडू शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: महाशिवरात्रीनिमित्त पौष्टिक आणि चविष्ट बनवायचे असेल, तर या ३ सोप्या रेसिपी नक्की ट्राय करा
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: महाशिवरात्री निमित्त उपवास रेसिपी; अतिशय पौष्टिक राजगिरा ड्रायफ्रुट्स लाडू
