Umaraga Mahashivratri celebration | उमरगा शहरात महाशिवरात्रीचा उत्साह; दर्शनासाठी भाविकांची मंदिरात गर्दी
उमरगा धाराशिवमध्ये महाशिवरात्री उत्सव भक्तिभावात साजरा
धाराशिव उमरगा : उमरगा शहरात ऐतिहासिक महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. पहाटेपासूनच विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
‘हर हर महादेव’च्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला असून सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. पहाटे मंगळआरतीनंतर अभिषेक, रुद्राभिषेक आणि विशेष पूजाविधी पार पडले.महाशिवरात्री निमित्त धार्मिक वातावरण निर्माण झाले असून भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून सुरक्षेची काळजी घेतली जात असून सण शांततेत आणि आनंदात पार पडावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत.
Home महत्वाची बातमी Umaraga Mahashivratri celebration | उमरगा शहरात महाशिवरात्रीचा उत्साह; दर्शनासाठी भाविकांची मंदिरात गर्दी
Umaraga Mahashivratri celebration | उमरगा शहरात महाशिवरात्रीचा उत्साह; दर्शनासाठी भाविकांची मंदिरात गर्दी
उमरगा धाराशिवमध्ये महाशिवरात्री उत्सव भक्तिभावात साजरा धाराशिव उमरगा : उमरगा शहरात ऐतिहासिक महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. पहाटेपासूनच विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला असून सर्वत्र भक्तीमय वातावरण […]
