महाराष्ट्रातील पहिले मत्स्य आरोग्य आणि निदान क्लिनिक सुरू होणार
घरच्या फिश टॅंकमध्ये मासे (fish) पाळण्याची आवड अनेकांना असते. अशा मत्स्यप्रेमींची संख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, अनेकदा या माशांच्या आजारपणात त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत. परिणामी ते मृत पावतात. परंतु आता माशांचा दवाखाना (fish clinic) सुरू केला जाणार आहे. त्याची सुरुवात वर्सोवा येथून होणार आहे.मुंबई (mumbai) उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार (ashish shelar) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत उपनगरांसाठी 1 हजार 497 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला. तसेच त्यात फिश हेल्थ अँड डायग्नोसिस क्लिनिक या राज्यातील (maharashtra) पहिल्यावहिल्या माशांच्या दवाखान्याला मंजुरी देण्यात आली. त्यासाठी 50 लाख रुपयांच्या निधीला ही मान्यता देण्यात आली.या उपक्रमामुळे माशांच्या आजाराचे वेळेत निदान होऊन आर्थिक नुकसान टळू शकणार आहे. तसेच शोभिवंत मत्स्य व्यवसायाला चालना आणि शाश्वत मत्स्यपालनाला प्रोत्साहन मिळणार आहे. बैठकीला मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह सर्व खासदार, आमदार आणि अधिकारी उपस्थित होते.वर्सोवा येथे मत्स्यपालन, शोभिवंत व पाळीव माशांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या दवाखान्यात माशांच्या आजारांचे निदान, उपचारासाठी विशेष व सुलभ आरोग्यसेवेसाठी सुविधा पुरवली जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्था (सीआयएफई) मस्त्य दवाखाना, थेट सेवा देणारे मोबाइल मत्स्य रुग्णालय, डिजिटल माध्यमातून सल्ला देणारी टेलीहेल्थ सेवा आणि पाळीव व शोभिवंत माशांसाठी प्रत्यक्ष घरी जाऊन आरोग्यसेवा पुरवली जाणार आहे.हेही वाचामहाराष्ट्रात मोफत रेशन यादीतून ‘इतकी’ नावे वगळलीकोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला भरपाई देण्याचे आदेश
Home महत्वाची बातमी महाराष्ट्रातील पहिले मत्स्य आरोग्य आणि निदान क्लिनिक सुरू होणार
महाराष्ट्रातील पहिले मत्स्य आरोग्य आणि निदान क्लिनिक सुरू होणार
घरच्या फिश टॅंकमध्ये मासे (fish) पाळण्याची आवड अनेकांना असते. अशा मत्स्यप्रेमींची संख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
मात्र, अनेकदा या माशांच्या आजारपणात त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत. परिणामी ते मृत पावतात. परंतु आता माशांचा दवाखाना (fish clinic) सुरू केला जाणार आहे. त्याची सुरुवात वर्सोवा येथून होणार आहे.
मुंबई (mumbai) उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार (ashish shelar) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत उपनगरांसाठी 1 हजार 497 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला.
तसेच त्यात फिश हेल्थ अँड डायग्नोसिस क्लिनिक या राज्यातील (maharashtra) पहिल्यावहिल्या माशांच्या दवाखान्याला मंजुरी देण्यात आली. त्यासाठी 50 लाख रुपयांच्या निधीला ही मान्यता देण्यात आली.
या उपक्रमामुळे माशांच्या आजाराचे वेळेत निदान होऊन आर्थिक नुकसान टळू शकणार आहे. तसेच शोभिवंत मत्स्य व्यवसायाला चालना आणि शाश्वत मत्स्यपालनाला प्रोत्साहन मिळणार आहे.
बैठकीला मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह सर्व खासदार, आमदार आणि अधिकारी उपस्थित होते.
वर्सोवा येथे मत्स्यपालन, शोभिवंत व पाळीव माशांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या दवाखान्यात माशांच्या आजारांचे निदान, उपचारासाठी विशेष व सुलभ आरोग्यसेवेसाठी सुविधा पुरवली जाणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्था (सीआयएफई) मस्त्य दवाखाना, थेट सेवा देणारे मोबाइल मत्स्य रुग्णालय, डिजिटल माध्यमातून सल्ला देणारी टेलीहेल्थ सेवा आणि पाळीव व शोभिवंत माशांसाठी प्रत्यक्ष घरी जाऊन आरोग्यसेवा पुरवली जाणार आहे.हेही वाचा
महाराष्ट्रात मोफत रेशन यादीतून ‘इतकी’ नावे वगळली
कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला भरपाई देण्याचे आदेश
