महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटा यांचं नाव देण्याची राज्य सरकारची घोषणा

ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने देशात शोककळा पसरली आहे. जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्य सरकार ने त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी रतन टाटा यांच्या नावाने महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार …

महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटा यांचं नाव देण्याची राज्य सरकारची घोषणा

ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने देशात शोककळा पसरली आहे. जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्य सरकार ने त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी रतन टाटा यांच्या नावाने महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली असून पुढील वर्षांपासून हा पुरस्कार दिला जाणार आहे.

तसेच मुंबईतील नरिमन पॉईंट येथे मोठं उद्योगभवन उभारण्यात येणार असून या उद्योग भवनाला रतन टाटा यांचे नाव दिले जाणार अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. 

हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. जेणे करून त्यांचे काम व स्मृती लोकांच्या लक्षात कायमस्वरूपी राहील. 

 

रतन टाटा यांना भारतरत्न मिळावे या साठी सर्वत्र मागणी केली जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यात रतन टाटांचे नाव भारतरत्न पुरस्कारासाठी प्रस्तावित करण्याचा निर्णय घेतला.

Edited By – Priya Dixit 

 

Go to Source