महाराष्ट्रात ST बसमध्ये बसवणार ब्रेथ अॅनालायझर प्रणाली
राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. आता बसमध्ये ब्रेक ॲनालायझर ही आधुनिक यंत्रणा बसवण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. ही यंत्रणा बसवल्यानंतर ड्रायव्हरनं दारू प्यायली असेल, तर ती बस सुरूच होऊ देणार नाही. या एका यंत्रणेची किंमत साधारण 1.5 लाख रुपये इतकी आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणाऱ्या नवीन बस तसेच टाटा आणि अशोक लेलँड कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये ही यंत्रणा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी बस मालकांनीही आपल्या गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसवावी, असे स्पष्ट निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत.स्लीपर कोच बसमधील अनधिकृत बदलांवर कारवाईअनेक खासगी बस चालक स्लीपर कोचच्या नावाखाली बसच्या रचनेत अनधिकृत बदल करतात, ज्यामुळे अपघाताच्या वेळी प्रवाशांना बाहेर पडणे कठीण होते. पूर्वी एकच स्लीपर कोच असायचा. मात्र आता दोन स्तरांवर स्लीपर कोच बसवले जात आहेत. परदेशात अशा स्लीपर कोचवर बंदी असली तरी भारतात केंद्र सरकारच्या नियमांनुसार ही सेवा सुरू आहे. महाराष्ट्राने यावर बंदी घातली तरी इतर राज्यांत नोंदणी झालेल्या बस राज्यात येऊ शकतात. ही तांत्रिक अडचणही मंत्र्यांनी स्पष्ट केली. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या बसवर कडक नजर ठेवली जात आहे.वेग मर्यादा आणि रस्ते सुरक्षेचा मास्टर प्लॅनबसेसच्या वाढत्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व बसमध्ये 80 किमी प्रतितास मर्यादेचा स्पीडोमीटर बसवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. काही खासगी बस 120 ते 140 किमी वेगाने धावत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, अशा गाड्यांवर कारवाई केली जाणार आहे.याशिवाय राज्यभरातील रस्त्यांसाठी एक विशेष सुरक्षा आराखडा तयार केला जात आहे. यामध्ये रिफ्लेक्टर, ॲरो मार्किंग, यु-टर्न आणि स्ट्रेट लेनसाठी दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. 100, 200, 300 आणि 500 मीटर अंतर दर्शवणारे बोर्ड सर्वच मुख्य रस्त्यांवर आणि महापालिका क्षेत्रांत लावले जाणार आहेत.हेही वाचामुंबई-पुणे एक्स्प्रेसवे ‘मिसिंग लिंक’ मे पर्यंत सुरू होणार
Home महत्वाची बातमी महाराष्ट्रात ST बसमध्ये बसवणार ब्रेथ अॅनालायझर प्रणाली
महाराष्ट्रात ST बसमध्ये बसवणार ब्रेथ अॅनालायझर प्रणाली
राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. आता बसमध्ये ब्रेक ॲनालायझर ही आधुनिक यंत्रणा बसवण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. ही यंत्रणा बसवल्यानंतर ड्रायव्हरनं दारू प्यायली असेल, तर ती बस सुरूच होऊ देणार नाही. या एका यंत्रणेची किंमत साधारण 1.5 लाख रुपये इतकी आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणाऱ्या नवीन बस तसेच टाटा आणि अशोक लेलँड कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये ही यंत्रणा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी बस मालकांनीही आपल्या गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसवावी, असे स्पष्ट निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत.
स्लीपर कोच बसमधील अनधिकृत बदलांवर कारवाई
अनेक खासगी बस चालक स्लीपर कोचच्या नावाखाली बसच्या रचनेत अनधिकृत बदल करतात, ज्यामुळे अपघाताच्या वेळी प्रवाशांना बाहेर पडणे कठीण होते. पूर्वी एकच स्लीपर कोच असायचा. मात्र आता दोन स्तरांवर स्लीपर कोच बसवले जात आहेत.
परदेशात अशा स्लीपर कोचवर बंदी असली तरी भारतात केंद्र सरकारच्या नियमांनुसार ही सेवा सुरू आहे. महाराष्ट्राने यावर बंदी घातली तरी इतर राज्यांत नोंदणी झालेल्या बस राज्यात येऊ शकतात. ही तांत्रिक अडचणही मंत्र्यांनी स्पष्ट केली. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या बसवर कडक नजर ठेवली जात आहे.
वेग मर्यादा आणि रस्ते सुरक्षेचा मास्टर प्लॅन
बसेसच्या वाढत्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व बसमध्ये 80 किमी प्रतितास मर्यादेचा स्पीडोमीटर बसवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. काही खासगी बस 120 ते 140 किमी वेगाने धावत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, अशा गाड्यांवर कारवाई केली जाणार आहे.
याशिवाय राज्यभरातील रस्त्यांसाठी एक विशेष सुरक्षा आराखडा तयार केला जात आहे. यामध्ये रिफ्लेक्टर, ॲरो मार्किंग, यु-टर्न आणि स्ट्रेट लेनसाठी दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. 100, 200, 300 आणि 500 मीटर अंतर दर्शवणारे बोर्ड सर्वच मुख्य रस्त्यांवर आणि महापालिका क्षेत्रांत लावले जाणार आहेत.हेही वाचा
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे ‘मिसिंग लिंक’ मे पर्यंत सुरू होणार
