महाराष्ट्र : 7 औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी
विधानसभा निवडणुकीच्या दोन महिन्यापुर्वी महाराष्ट्र (maharashtra) सरकारने (government) सात मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या अध्यक्षतेखालील उद्योगविषयक मंत्रिमंडळ उपसमितीने मंगळवारी या प्रकल्पांना (projects) मंजुरी दिली.प्रकल्पांमध्ये लिथियम बॅटरी, इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर चिप्स आणि फळांच्या लगद्याच्या उत्पादनाच्या क्षेत्रातील सात मेगा आणि अल्ट्रा-मेगा उद्योगांचा समावेश आहे. ज्यामध्ये कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील भागात भरीव गुंतवणूकीची (investment) योजना आहे.सर्वात मोठ्या ग्रीन-लाइट प्रकल्पांपैकी जेएसडबल्यू ग्रीन मोबिलिटी जे छत्रपती संभाजीनगरमधील (chatrapati sambhaji nagar) राज्याचे पहिले अल्ट्रा-मेगा इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहन उत्पादन प्रकल्प असेल. जेएसडबल्यू समूहाचीच उपकंपनी असलेल्या कंपनीने 27,200 कोटी गुंतवण्याची ऑफर दिली आहे आणि 5,200 हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच वर्षाला 500,000 इलेक्ट्रिक प्रवासी कार आणि 100,000 व्यावसायिक कार तयार करण्याची योजना आहे.जेएसडबल्यू (JSW) समूहाची आणखी एक उपकंपनी ज्याला मंजुरी मिळाली ती जेएसडबल्यू एनर्जी पीएसपी इलेव्हन होती. ज्याने 25,000 कोटी रुपयांचा लिथियम बॅटरी उत्पादन प्रकल्प नागपुरात उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रकल्पातून 5,000 हून अधिक रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.मंत्रिमंडळाच्या उपसमितीने नागपूरमधील (nagpur) बुटीबोरी आणि पनवेलमधील एमआयडीसी भोपरपारा येथे उभारण्यात येणाऱ्या अवाडा इलेक्ट्रोच्या सौर आणि फोटोव्होल्टेइक मॉड्यूल्स आणि इलेक्ट्रोलायझर प्रकल्पालाही मान्यता दिली. यामध्ये 13,647 कोटी गुंतवणुकीचा समावेश असेल आणि 8,000 हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड रायगड (raigad) जिल्ह्यातील तळोजा येथे सेमीकंडक्टर चिप उत्पादन प्रकल्प स्थापन करणार आहे. 12,000 कोटींची गुंतवणुक या प्रकल्पात होणार आहे आणि त्यातून 4,000 हून अधिक रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. दुसऱ्या टप्प्यात महापे, नवी मुंबई (navi mumbai) येथे दुसरा प्रकल्प उभारला जाणार आहे. सप्टेंबर 2024 पर्यंत हे चाचणीच्या आधारावर सुरू होण्याची अपेक्षा आहे.प्रकल्पांच्या यादीत नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसीमध्ये मद्य उत्पादनासाठीचा एक मेगा प्रकल्प देखील समाविष्ट आहे. ड्रिंक्स कंपनी Pernod Ricard India प्रकल्प स्थापन करण्यासाठी 1,785 कोटींची गुंतवणूक करणार आहे. हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस रत्नागिरीमध्ये फळांचा लगदा आणि रस उत्पादनाचा एक मोठा प्रकल्प उभारणार आहे, ज्यासाठी त्यांनी 1,500 कोटींची गुंतवणूक करण्यास सहमती दर्शवली आहे.विरोधी महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुती सरकारवर महाराष्ट्राने इतर राज्यांच्या तुलनेत मोठे प्रकल्प गमावल्याबद्दल टीका केल्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा झाली आहे.हेही वाचाहार्बर मार्गावरील लोकल सँडहर्स्ट रोडपर्यंतच धावणार?आता मुंबईहून कुवेतपर्यंत थेट विमानसेवा सुरू
Home महत्वाची बातमी महाराष्ट्र : 7 औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी
महाराष्ट्र : 7 औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी
विधानसभा निवडणुकीच्या दोन महिन्यापुर्वी महाराष्ट्र (maharashtra) सरकारने (government) सात मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या अध्यक्षतेखालील उद्योगविषयक मंत्रिमंडळ उपसमितीने मंगळवारी या प्रकल्पांना (projects) मंजुरी दिली.
प्रकल्पांमध्ये लिथियम बॅटरी, इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर चिप्स आणि फळांच्या लगद्याच्या उत्पादनाच्या क्षेत्रातील सात मेगा आणि अल्ट्रा-मेगा उद्योगांचा समावेश आहे. ज्यामध्ये कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील भागात भरीव गुंतवणूकीची (investment) योजना आहे.
सर्वात मोठ्या ग्रीन-लाइट प्रकल्पांपैकी जेएसडबल्यू ग्रीन मोबिलिटी जे छत्रपती संभाजीनगरमधील (chatrapati sambhaji nagar) राज्याचे पहिले अल्ट्रा-मेगा इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहन उत्पादन प्रकल्प असेल.
जेएसडबल्यू समूहाचीच उपकंपनी असलेल्या कंपनीने 27,200 कोटी गुंतवण्याची ऑफर दिली आहे आणि 5,200 हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच वर्षाला 500,000 इलेक्ट्रिक प्रवासी कार आणि 100,000 व्यावसायिक कार तयार करण्याची योजना आहे.
जेएसडबल्यू (JSW) समूहाची आणखी एक उपकंपनी ज्याला मंजुरी मिळाली ती जेएसडबल्यू एनर्जी पीएसपी इलेव्हन होती. ज्याने 25,000 कोटी रुपयांचा लिथियम बॅटरी उत्पादन प्रकल्प नागपुरात उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रकल्पातून 5,000 हून अधिक रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
मंत्रिमंडळाच्या उपसमितीने नागपूरमधील (nagpur) बुटीबोरी आणि पनवेलमधील एमआयडीसी भोपरपारा येथे उभारण्यात येणाऱ्या अवाडा इलेक्ट्रोच्या सौर आणि फोटोव्होल्टेइक मॉड्यूल्स आणि इलेक्ट्रोलायझर प्रकल्पालाही मान्यता दिली. यामध्ये 13,647 कोटी गुंतवणुकीचा समावेश असेल आणि 8,000 हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड रायगड (raigad) जिल्ह्यातील तळोजा येथे सेमीकंडक्टर चिप उत्पादन प्रकल्प स्थापन करणार आहे. 12,000 कोटींची गुंतवणुक या प्रकल्पात होणार आहे आणि त्यातून 4,000 हून अधिक रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
दुसऱ्या टप्प्यात महापे, नवी मुंबई (navi mumbai) येथे दुसरा प्रकल्प उभारला जाणार आहे. सप्टेंबर 2024 पर्यंत हे चाचणीच्या आधारावर सुरू होण्याची अपेक्षा आहे.
प्रकल्पांच्या यादीत नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसीमध्ये मद्य उत्पादनासाठीचा एक मेगा प्रकल्प देखील समाविष्ट आहे. ड्रिंक्स कंपनी Pernod Ricard India प्रकल्प स्थापन करण्यासाठी 1,785 कोटींची गुंतवणूक करणार आहे.
हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस रत्नागिरीमध्ये फळांचा लगदा आणि रस उत्पादनाचा एक मोठा प्रकल्प उभारणार आहे, ज्यासाठी त्यांनी 1,500 कोटींची गुंतवणूक करण्यास सहमती दर्शवली आहे.
विरोधी महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुती सरकारवर महाराष्ट्राने इतर राज्यांच्या तुलनेत मोठे प्रकल्प गमावल्याबद्दल टीका केल्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा झाली आहे.हेही वाचा
हार्बर मार्गावरील लोकल सँडहर्स्ट रोडपर्यंतच धावणार?
आता मुंबईहून कुवेतपर्यंत थेट विमानसेवा सुरू