महाराष्ट्र (maharashtra) सरकारने 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेअंतर्गत बीव्हीजी इंडिया लिमिटेड सोबतचा करार संपवला आहे. आता आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी 102 रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात येणार आहे.सोमवार, 1 जुलै रोजी, भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी विधान परिषदेत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे व्यवस्थापित केलेल्या रुग्णवाहिका सेवांच्या निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवा (Ambulance service) बंद केल्या जातील. परंतु रुग्णांच्या सेवेवर कोणताही नकारात्मक परिणाम होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या जातील. सध्याच्या 957 रुग्णवाहिकांचा ताफा आता नवीन 102च्या सेवेखाली काम करेल. 108 रुग्णवाहिकेतील गैरव्यवस्थापनाची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिट देखील सुरू करण्यात आले आहे. ज्यामुळे लेखापरीक्षणात कोणतीही अनियमितता असेल तर ती कळून येईल, असा खुलासा मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. रुग्णवाहिका खरेदी आणि ऑपरेशन्सचे नियमन करण्यासाठी सरकारने यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये एक अध्यादेश जारी केला होता. नंतर हे उघड झाले की, संबंधित क्षेत्राचा अनुभव नसलेल्या कंपनीला कंत्राट अयोग्यरीत्या देण्यात आले होते. ज्यामुळे रुग्णांचे आर्थिक आणि आरोग्य असे दोन्हींचे नुकसान झाले.तसेच सरकारने रुग्णवाहिका सेवेशी संबंधित निधीचे गैरव्यवस्थापन केल्याचा संशय असलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली आहे. मंत्री तानाजी सावंत यांनी इशारा दिला की, पूर्वीच्या ठेकेदारांनी वेगळ्या नावाने मार्केटमध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्याची बारकाईने तपासणी केली जाईल.108 रुग्णवाहिका सेवेची स्थापना 2009 मध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी केली होती. 2014 ते 2024 या दहा वर्षांत, 108 नंबर सेवेने एकूण 9,542,039 इतक्या आपत्कालीन प्रकरणांना मदत केली.हेही वाचाजेजे रुग्णालयातील कर्मचारी 3 जुलैपासून बेमुदत संपावरघर खरेदीदाराला 66 लाखांपर्यंत रक्कम व्याजासकट परत करण्याचे आदेश
आपत्कालीन परिस्थितीत ‘या’ नंबरवर कॉल करा