महाराष्ट्र (maharashtra) सरकारने सोमवारी एक आदेश लागू केला. ज्यात गायीला (cow) ‘राज्य माता’ म्हणून घोषित केले आहे. भारतीय परंपरेतील गायींचे सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे.अधिकृत आदेशात, एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सांगितले की, गाय ही भारतीय परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्राचीन काळापासून गायीचे आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि लष्करी महत्त्व आहे. तसेच राज्यातील दुग्ध व्यवसाय हा गाईंवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. देशी गायींच्या कमी होणाऱ्या संख्येबद्दल चिंतासंपूर्ण भारतात आढळणाऱ्या गायींच्या विविध जातींवर प्रकाश टाकून महाराष्ट्र सरकारनेही (government) देशी गायींच्या (indian cow) कमी होणाऱ्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. आपल्या अधिकृत आदेशात सरकारने शेतीमध्ये शेणाचा वापर करण्यावर भर दिला आहे. जे शेतात मोठ्या प्रमाणावर खत म्हणून वापरले जाते.गाई आणि तिच्या उत्पादनांशी संबंधित सामाजिक-आर्थिक घटक तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन सरकारने पशुपालकांना देशी गायी पाळण्यास प्रोत्साहित केले आहे. हेही वाचानोकरी दिली असती तर बरे झाले असते : राज ठाकरेअबब! 2,931 झाडे लावण्यासाठी12 कोटी खर्च
महाराष्ट्र सरकारकडून गायीला ‘राज्य माता’चा दर्जा