2 आणि 3 डिसेंबर सार्वजनिक सुट्टी जाहीर

महाराष्ट्रात निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील काही ठिकाणी होणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ही सुट्टी आहे. पण ३ डिसेंबर २०२५ रोजी मात्र कोणतीही …

2 आणि 3 डिसेंबर सार्वजनिक सुट्टी जाहीर

महाराष्ट्रात निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील काही ठिकाणी होणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ही सुट्टी आहे. पण  ३ डिसेंबर २०२५ रोजी मात्र कोणतीही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही, कारण हा दिवस मतमोजणी आणि निकाल घोषणेचा आहे. अशी माहिती समोर आली आहे. 

ALSO READ: भारताने चक्रीवादळग्रस्त श्रीलंकेला केली मदत, ऑपरेशन सागर बंधू सुरू

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपरिषद आणि नगरपंचायत) निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी मतदान प्रक्रियेसाठी पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यास सुलभ करण्यासाठी घेण्यात आली आहे. ३ डिसेंबर २०२५ रोजी मात्र कोणतीही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही, कारण हा दिवस मतमोजणी आणि निकाल घोषणेचा आहे. तसेच सरकारी कार्यालये, निमशासकीय कार्यालये, बँका, सार्वजनिक उपक्रम आणि खासगी संस्थांवर ही सुट्टी लागू राहील. पात्र मतदारांना म्हणजेच ज्यांना त्या मतदारसंघात मतदान करायचे आहे पेड लीव्ह मिळेल.

ALSO READ: छत्तीसगडमध्ये काँग्रेसने मोठे बदल केले, ४१ जिल्हा समित्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती

तसेच ३ डिसेंबर २०२५ रोजी कोणतीही सार्वजनिक सुट्टी नाही. हा दिवस निकाल घोषणेचा आहे, आणि सामान्य दिवसाप्रमाणेच कार्यालये, बँका सुरू राहतील. जर एखाद्या विशिष्ट भागात अतिरिक्त सुट्टी असेल, तर स्थानिक प्रशासनाची अधिसूचना तपासा.

ALSO READ: नरिमन पॉइंट ते विरार आता १ तासात; मुंबईत २४ किमी लांबीचा सागरी मार्ग बांधला जाणारा

Edited By- Dhanashri Naik

Go to Source