Maharashtra Live News Today in Marathi शनिवार 9 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates in Marathi

Maharashtra Live News Today in Marathi शनिवार 9 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Maharashtra Marathi Breaking News Live Today: विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी असून महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील राज्यात आठवडाभरात नऊ सभा घेणार आहेत. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….आज शनिवार 9 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी अकोला आणि नांदेडमध्ये निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहे.
काँग्रेस जातींना लढविण्याचे काम करत आहे, महाराष्ट्रात गरजले नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर एका जातीला दुसऱ्या जातीविरोधात उभे करण्याचा आरोप केला आणि लोकांना एकजूट राहण्याचा इशारा दिला. काँग्रेस उपेक्षित गटांविरुद्ध षडयंत्र रचत असल्याचेही त्यांनी सांगितले. या भागात आदिवासी समाजाचे वर्चस्व आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान मोदींची ही पहिलीच सभा होती.

Go to Source