LIVE: मुंबईत राहणाऱ्या बांगलादेशींवर एकूण 195 गुन्हे दाखल
Maharashtra Marathi Breaking News Live Today: या वर्षात मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींवर एकूण १९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये एकूण 278 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. बांगलादेशी अवैध घुसखोरांवरही मुंबई पोलीस कारवाई करत आहे. गेल्या तीन आठवड्यात मुंबईतील विविध भागातून बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
मुंबईतील महालक्ष्मी परिसरात दोन जणांनी बंदुकीचा आणि चाकूचा धाक दाखवून दागिन्यांच्या दुकान लुटले, अशी माहिती मुंबई पोलीस अधिकाऱ्याने दिली. सविस्तर वाचा
भंडारा जिल्ह्यातील जंगलात वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे वाघांचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही येत आहे. 30 डिसेंबर रोजी एका शावकाचा मृत्यू झाला. सविस्तर वाचा
नागपुरात रस्त्यावर रात्री दुहेरी हत्याकांड घडले. पैशावरून सुरू असलेल्या वादातून ही घटना घडली. पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. सविस्तर वाचा