LIVE: शेतकऱ्यांचे महाएल्गार आंदोलन नागपूरच्या जामठा येथे सुरू
Maharashtra Marathi Breaking News Live Today : बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांचे महाएल्गार आंदोलन नागपूरच्या जामठा येथे सुरू झाले आहे. कर्जमाफी, आधारभूत किंमत आणि अपंगत्व निवृत्तीवेतनाच्या मागणीसाठी हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले.
रामटेक तालुक्यात झिंजेरिया गावात कापूस वेचणाऱ्या वृद्ध महिलेवर वाघाने हल्ला केला आणि तिला जंगलात ओढले. महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गडचिरोलीमध्ये गोवंश तस्करीच्या दोन प्रकरणांमध्ये पोलिसांनी 12गुरांची सुटका केली आणि पाच आरोपींना अटक केली. दोन वाहने जप्त करण्यात आली.गडचिरोली जिल्ह्यात गुरांच्या तस्करीच्या घटना सतत सुरू आहेत.
ठाणे महानगरपालिकेने “आपला दवाखाना” चालवणाऱ्या मेड ऑन गो हेल्थ या कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे आणि कर्मचाऱ्यांचे थकित वेतन दोन दिवसांत देण्याचे आदेश दिले आहेत.
ठाणे महानगरपालिका प्रशासनाने शहरात तुमचा दवाखाना चालवणाऱ्या मेड ऑन गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर दंडात्मक कारवाई केली आहे
बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांचे महाएल्गार आंदोलन नागपूरच्या जामठा येथे सुरू झाले आहे. कर्जमाफी, आधारभूत किंमत आणि अपंगत्व निवृत्तीवेतनाच्या मागणीसाठी हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले.शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, त्यांच्या उत्पादनांना आधारभूत किंमत, अपंगांना 6,000 रुपये मासिक मानधन आणि शेळीपालक आणि मच्छीमारांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी शहराच्या सीमेवर प्रचंड निदर्शने केली.सविस्तर वाचा..
