LIVE: महाराष्ट्रात पाऊस व वादळात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू
Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्रात मान्सूनने कहर करायला सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळ सुरू आहे. वादळात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने याबाबत जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
