Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्रातील पुण्यात 100 हून अधिक लोकांना ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ (GBS) ची लागण झाली आहे. यामध्ये सोलापूर येथील एका व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी म्हटले आहे की, संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभाग चांगले काम करत आहे. यासोबतच, लवकरच तज्ज्ञ पथक यावर आपले मत देईल अशी माहिती त्यांनी दिली. पुण्यात या रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित विकाराने संक्रमित झालेल्यांची संख्या 101 वर पोहोचली आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, दिल्ली निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही. तसेच ते म्हणाले की, पुढील 25 वर्षे काँग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेत येणे कठीण होईल. सविस्तर वाचामहाराष्ट्रात सोमवारी सोलापूरमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे आणखी नऊ रुग्ण आढळले. यामुळे रुग्णांची संख्या आता 111 झाली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, या रुग्णांमध्ये 73 पुरुष आणि 37 महिलांचा समावेश आहे. तर 17 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहे. सविस्तर वाचा
LIVE: पुण्यात ‘GBS’ चे 101 रुग्ण