LIVE: माजलगावचे भाजपचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचा रस्ते अपघातात मृत्यू
Maharashtra Marathi Breaking News Live Today: राज्यात मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे आणि पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. आता एका माजी आमदाराचा पावसामुळे गाडी घसरल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.औसा तालुक्यातील बेलकुंडजवळ हा अपघात झाला. जेव्हा देशमुख एसयूव्हीमधून तुळजापूर-लातूर रस्त्यावरून जात होते.
राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
