LIVE: मुंबईत टेम्पो ऑटोरिक्षाच्या धडकेत 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Maharashtra Marathi Breaking News Live Today:मुंबईत बोरिवली परिसरात हिट अँड रन ची घटना घडली आहे. या अपघातात एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सुनील विश्वकर्मा असे या मयत तरुणाचे नाव आहे. मयत नालासोपारा पूर्वचा रहिवासी होता. अपघातांनंतर तरुणाला …

LIVE: मुंबईत टेम्पो ऑटोरिक्षाच्या धडकेत 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Maharashtra Marathi Breaking News Live Today:मुंबईत बोरिवली परिसरात हिट अँड रन ची घटना घडली आहे. या अपघातात एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सुनील विश्वकर्मा असे या मयत तरुणाचे नाव आहे. मयत नालासोपारा पूर्वचा रहिवासी होता. अपघातांनंतर तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादरमायन त्याचा मृत्यू झाला. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….

 
मुंबईत बोरिवली परिसरात हिट अँड रन ची घटना घडली आहे. या अपघातात एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सुनील विश्वकर्मा असे या मयत तरुणाचे नाव आहे. मयत नालासोपारा पूर्वचा रहिवासी होता. अपघातांनंतर तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादरमायन त्याचा मृत्यू झाला. सविस्तर वाचा..
महाराष्ट्रातील रायगड मध्ये समुद्रात बुडून एका महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. सदर घटना हरिहरेश्वर समुद्राच्या किनाऱ्यावर सहली दरम्यान घडली. पल्लवी सरोदे तिच्या ऑफिसच्या सहकाऱ्यांसोबत सहलीसाठी हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर गेली होती. समुद्रात शिरली असताना जोरदार लाटा आल्या आणि त्यात ती वाहून गेली आणि तिचा बुडून मृत्यू झाला. प्रशासकीय अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे.  सविस्तर वाचा… 

 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रार्थना केली आणि संत आणि महंतांशी संवाद साधला. जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी सकाळी भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या मंदिरात आरती केली.सविस्तर वाचा…

Go to Source