LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरला पोहोचून पर्यटकांची भेट घेतली
Maharashtra Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्रातील पर्यटकांची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट घेतली. पहलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक तिथे अडकले आहे. त्यांना तेथून सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरला पोहोचून पर्यटकांची भेट घेतली.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ जणांना आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यासाठी विरोधकांनी अमित शहांना जबाबदार धरले आहे. सविस्तर वाचा
