LIVE: नवी मुंबईत गुंतवणुकीच्या नावाखाली एका व्यावसायिकाची 77 लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल
Maharashtra Marathi Breaking News Live Today : नवी मुंबईत 34 वर्षीय व्यावसायिकाची 77 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलांनी गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाला जास्त परतावा देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
नवी मुंबईत 34 वर्षीय व्यावसायिकाची 77 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलांनी गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाला जास्त परतावा देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली.सविस्तर वाचा…
धनंजय मुंडे यांचे जवळचे आणि वेंकटेश्वरा इंड्रस्टीयल सर्व्हिसचे डायरेक्टर राजेंद्र घनवट यांची पत्नी मनाली घनवट यांचा पुण्यात सोमवारी आकस्मिक मृत्यू झाला. पुण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र त्यांच्या मृत्यू नंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे.सविस्तर वाचा…