LIVE: सरकारने बेकायदेशीर बांगलादेशींना परत पाठवावे- मिलिंद देवरा

Maharashtra Marathi Breaking News Live Today: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला अटक केल्यानंतर, आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे उघड झाले. हे उघडकीस येताच राज्याच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहे. या मुद्द्यावर, शिवसेना …

LIVE: सरकारने बेकायदेशीर बांगलादेशींना परत पाठवावे- मिलिंद देवरा

Maharashtra Marathi Breaking News Live Today: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला अटक केल्यानंतर, आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे उघड झाले. हे उघडकीस येताच राज्याच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहे. या मुद्द्यावर, शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी महाराष्ट्र सरकारला राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींना लवकरात लवकर परत पाठवण्याची विनंती केली आहे, जेणेकरून “मुंबई सुरक्षित करता येईल”. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करल्यानंतर, काँग्रेस भाजपला लक्ष्य करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. काँग्रेसने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि 25 जानेवारी रोजी राज्यभर निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. सविस्तर वाचा
लग्न समारंभाला जाऊन घरी परतणाऱ्या एका कुटुंबाचा समृद्धी मार्गावर अपघात झाला. गाडी अनियंत्रित झाली आणि दुभाजकाला धडकली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर सून आणि मुलासह 5 नातेवाईक गंभीर जखमी झाले. सविस्तर वाचा

Go to Source