LIVE: संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि निशिकांत दुबे यांच्यावर हल्लाबोल केला
Maharashtra Marathi Breaking News Live Today: संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या विधानाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी दुबेंना नाही तर भाजपला इशारा दिला आहे. मराठी अस्मितेवरील हल्ले आम्ही सहन करणार नाही. उद्धव ठाकरे आणि राज या मुद्द्यावर पूर्णपणे एकमत आहेत. यासोबतच त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवरही टीका केली. ते म्हणाले की, या नेत्यांनी आधी प्रतिक्रिया द्यावी, त्यानंतरच ते राज ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया देतील.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या विधानाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी दुबेंना नाही तर भाजपला इशारा दिला आहे. मराठी अस्मितेवरील हल्ले आम्ही सहन करणार नाही. उद्धव ठाकरे आणि राज या मुद्द्यावर पूर्णपणे एकमत आहेत. यासोबतच त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवरही टीका केली. ते म्हणाले की, या नेत्यांनी आधी प्रतिक्रिया द्यावी, त्यानंतरच ते राज ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया देतील.सविस्तर वाचा…
अंधेरी-पश्चिमेतील लोखंडवाला परिसरातील खारफुटीच्या बेकायदेशीर कत्तलीची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. खारफुटीच्या जंगलांच्या कत्तलीची तक्रार गांभीर्याने घेत, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे शनिवारी सत्य जाणून घेण्यासाठी लोखंडवाला बॅक रोडवर पोहोचल्या.सविस्तर वाचा…