LIVE: हिवाळी अधिवेशनात शिंदेनी आपल्या लाडक्या बहिणींना दिले हे वचन
Maharashtra Marathi Breaking News Live Today: सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सुरू असून त्यात लाडकी बहीण योजनेतून पैसे कापल्याचीही चर्चा आहे. याबाबत आता एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व भगिनींना वचन दिले आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते..
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला विधानपरिषदेत उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्याला प्रत्येक क्षेत्रात नंबर वन करण्यासाठी सरकार संघभावनेने काम करत आहे. तसेच लक्ष्य एकच आहे ते म्हणजे ‘मिशन समृद्ध महाराष्ट्र’. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवरही जोरदार हल्लाबोल केला. सविस्तर वाचा
राज्यातील उद्योग गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप प्रत्येक वेळी विरोधी पक्ष करतात. पण वास्तव हे आहे की महाराष्ट्र याआधीही नंबर वन होता आणि भविष्यातही नंबर वन राहील. सर्व मिळून राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर्सची करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिली. सविस्तर वाचा