LIVE: पुण्यात कार आणि ट्रकच्या धडकेत ८ जणांचा मृत्यू
Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्रातील पुणे येथील जेजुरी मोरगाव रोडवर बुधवारी रात्री एका हायस्पीड कार आणि पिकअप ट्रकची टक्कर झाली. या घटनेत सुमारे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत सात पुरुष आणि एका महिलेसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन मुलांसह चार जण जखमी झाले आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
महाराष्ट्रातील पुणे येथील जेजुरी मोरगाव रोडवर बुधवारी रात्री एका हायस्पीड कार आणि पिकअप ट्रकची टक्कर झाली. या घटनेत सुमारे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत सात पुरुष आणि एका महिलेसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन मुलांसह चार जण जखमी झाले आहे. सविस्तर वाचा
बीड जिल्ह्यातील एफडी ठेव रक्कम परत करण्यास नकार दिल्याने नाराज झालेल्या एका ४६ वर्षीय शेतकऱ्याने बुधवारी सहकारी संस्थेच्या कार्यालयासमोर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटेच्या वेळी सोसायटीच्या शाखा कार्यालयाबाहेर लोखंडी अँगलला लटकलेल्या अवस्थेत शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर वाचा
