LIVE: सोलापूरचे निष्ठावंत नेते बळीराम काका साठे शरद पवारांची साथ सोडणार

Maharashtra Marathi Breaking News Live Today: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) जिल्हाध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम काका साठे यांनी खासदार धैर्यशील मोहिते …

LIVE: सोलापूरचे निष्ठावंत नेते बळीराम काका साठे शरद पवारांची साथ सोडणार

Maharashtra Marathi Breaking News Live Today: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) जिल्हाध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम काका साठे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर शाब्दिक हल्ला केल्यानंतर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.सोलापूरमध्ये शरद पवारांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.

 
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) जिल्हाध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम काका साठे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर शाब्दिक हल्ला केल्यानंतर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.सोलापूरमध्ये शरद पवारांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.सविस्तर वाचा… 

 
समाजातील वंचित घटकांसाठी आवाज उठवणारे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आहेत. शेतकरी, शेतमजूर आणि अपंगांच्या हक्कांसाठी 7 दिवस उपोषणाला बसलेले कडू आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावरून अपात्र ठरले आहेत.

 
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या सोमवार, 16जून रोजी वर्धा येथे पोहोचले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि जिल्ह्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 800 रोहिंग्यांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांवर प्रश्न उपस्थित केले.

 
राज्यातील शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर आता शैक्षणिक संस्था चालकही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. 
धाराशिव जिल्ह्यातील एका छोट्या गावात रविवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ज्यामुळे संपूर्ण गाव हादरून गेले.आपल्या कुटुंबासाठी ट्रॅक्टर चालवणाऱ्या कष्टाळू तरुणाने एकाच रात्री आपले संपूर्ण कुटुंब संपवले.
राज्यातील शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या घरात ‘अघोरी’ पूजा केल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी केला आहे. या संदर्भात ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करणार असल्याचे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.सविस्तर वाचा… 

 

Go to Source