LIVE: मुंबईतील दर्ग्याजवळ सिलेंडरचा स्फोट
Maharashtra Marathi Breaking News Live Today: मुंबईतील माहीम येथील मखदूम शाह बाबा दर्ग्याजवळ लागलेल्या आगीत ८ जण जखमी झाले. मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, माहीम पश्चिमेतील कॅडेल रोडवरील मखदूम शाह दर्ग्याजवळ असलेल्या मखदूम फूड स्टोअरमध्ये रात्री ८.१७ वाजता स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागली. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.महाराष्ट्रातील मुंबईमध्ये शुक्रवारी रात्री मुंबईतील माहीम येथील मखदूम शाह बाबा दर्ग्याजवळ लागलेल्या आगीत ८ जण जखमी झाले. सविस्तर वाचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नदीकाठच्या भागात पूर नियंत्रण उपाययोजना करण्याचे आणि पूर रेषेशी संबंधित मार्गदर्शक तत्वे दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक झाली. यावेळी स्थानिक आमदार किसन कथोरे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सविस्तर वाचा
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पावसाबाबत काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केले आहे. सविस्तर वाचा