Maharashtra Live News Today in Marathi पंतप्रधान मोदी आज चिमूर-सोलापूर आणि पुण्यात सभेला संबोधित करणार
Maharashtra Marathi Breaking News Live Today: विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी असून महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
पंतप्रधान मोदी आज चिमूर-सोलापूर आणि पुण्यात सभेला संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, ते मंगळवार, 13 नोव्हेंबर रोजी चिमूर आणि सोलापूरमध्ये निवडणूक सभांना संबोधित करणार आहे. गेल्या आठवडाभरात पंतप्रधान मोदींचा हा तिसरा महाराष्ट्र दौरा आहे.
विधानसभा निवडणूक : भाजपविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाकडे आठ तक्रारी सादर केल्या.
उद्धव ठाकरेंची मशाल घरांमध्ये आग लावत आहे, मुख्यमंत्री शिंदे अस का म्हणाले?
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले ‘मशाल’ आज घरे पेटवण्याचे आणि समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. फडणवीस मुस्लिम समाजाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे-ओवेसी
ओवेसींच्या वक्तव्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिउत्तर