LIVE: नागपूरच्या अॅल्युमिनियम प्लांटमध्ये स्फोट
Maharashtra Marathi Breaking News Live Today: नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसीमध्ये आगीची घटना घडली आहे. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा येथील एका अॅल्युमिनियम फॉइल आणि पावडर उत्पादन कंपनीत स्फोट झाला. स्फोटानंतर लागलेल्या आगीत सात जण जखमी झाले असून त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहे. जखमींना उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. “राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एका अॅल्युमिनियम युनिटमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटात आठ जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. उमरेड एमआयडीसीमधील एमएमपी अॅल्युमिनियम इंडस्ट्रीजमध्ये संध्याकाळी ७ वाजता स्फोट झाला, अशी माहिती उमरेड पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिली. सविस्तर वाचाकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात रायगड किल्ल्याला भेट देणार आहे. येथे ते मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला पुष्पांजली अर्पण करतील. सविस्तर वाचा
