LIVE: सुरेश कुटे यांना ईडीचा दणका, 188.41 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
Maharashtra Marathi Breaking News Live Today :ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड (DMCSL) शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 188.41कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.तपासात असे आढळून आले की सुरेश कुटे यांच्या नेतृत्वाखालील डीएमसीएसएल व्यवस्थापनाने 4 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केली आणि वैयक्तिक फायद्यासाठी पैसे कुटे ग्रुपच्या संस्थांना हस्तांतरित केले.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड (DMCSL) शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 188.41कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.तपासात असे आढळून आले की सुरेश कुटे यांच्या नेतृत्वाखालील डीएमसीएसएल व्यवस्थापनाने 4 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केली आणि वैयक्तिक फायद्यासाठी पैसे कुटे ग्रुपच्या संस्थांना हस्तांतरित केले.सविस्तर वाचा….
प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी आणि जेउर रेल्वे स्थानकांदरम्यान भालवानीजवळ दोन वेगवेगळ्या गाड्यांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. शनिवारी रात्री उशिरा, अज्ञात लोकांनी प्रथम मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक केली. या हल्ल्यात ट्रेनच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि 4 प्रवासी जखमी झाले.सविस्तर वाचा….
जिल्ह्यात हवामान खात्याचा अंदाज अंशतः का होईना, खरा ठरत असल्याचे दिसून येत आहे. विभागाने विदर्भातील जिल्ह्यांसाठी एक अंदाज वर्तवला आहे.सविस्तर वाचा….
