LIVE: अजंता केटरर्स चालवणाऱ्या कॅन्टीनचा परवाना रद्द
Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्र सरकारच्या अन्न आणि औषध विभागाने (एफडीए) अजंता केटरर्स चालवणाऱ्या कॅन्टीनचा परवाना रद्द केला आहे. बुधवार, ९ जुलै रोजी अन्नाचे नमुने घेण्यात आले आणि निकृष्ट दर्जाच्या तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आली. कॅन्टीनमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबद्दल वारंवार तक्रारी करूनही कोणतीही सुधारणा न झाल्याने आमदार गायकवाड यांनी मंगळवारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका शाळेत एक लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. येथे विद्यार्थिनींना जबरदस्तीने कपडे काढायला लावण्यात आले आणि त्यांची तपासणी करण्यात आली, कारण शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग आढळले. सविस्तर वाचा
चर्चगेट येथील आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न वाढल्याबद्दल शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकरणाला आता वेग आला आहे. आता महाराष्ट्र सरकारच्या अन्न आणि औषध विभागाने (एफडीए) अजंता केटरर्स चालवणाऱ्या कॅन्टीनचा परवाना रद्द केला आहे. सविस्तर वाचा