LIVE: महाराष्ट्र सरकार नक्षलवादाला आळा घेण्यासाठी नवीन कायदा आणणार
Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्र सरकार शहरी भागातील नक्षलवाद आणि त्याच्या समर्थकांना आळा घालण्यासाठी एक नवीन कायदा आणण्याची तयारी करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्याचा आढावा घेतला. हे विधेयक पावसाळी अधिवेशनात विधानसभेत मांडले जाईल. या विधेयकाचे नाव महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक आहे, जे राज्य विधिमंडळाच्या संयुक्त निवड समितीने अंतिम केले आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
कोकणातील उर्वरित भागात, मध्य महाराष्ट्रातील घाट, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. सविस्तर वाचा
महाराष्ट्र सरकार शहरी भागातील नक्षलवाद आणि त्याच्या समर्थकांना आळा घालण्यासाठी एक नवीन कायदा आणण्याची तयारी करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्याचा आढावा घेतला. सविस्तर वाचा
